कृत्रिम अवयवांसाठी सोलापूरचे ‘पायोनियर’ उत्तम पर्याय…!

१९८० च्या दशकात दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मिळणे हे एक दिव्य स्वप्नच होते. कुबड्यांचा आधार किंवा काठीवर भार देत शरीराचा समतोल राखत आपली दैनंदिनी पार पाडताना दिव्यांगांना (अपंगांना) मोठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. एखाद्या धनिकाला महानगरात जावून लाखों रुपये खर्च करून कृत्रिम अवयव बसविणे शक्य असायचे. मात्र सर्वसामान्यांचे भयंकर हाल व्हायचे. मरण परवडले परंतु अपंग म्हणून जगणे नको. अशा काळात १९८२ मध्ये प्रसिद्ध प्रोस्थेटिस्ट अँड ऑर्थोटिस्ट औदुंबर बासूतकर यांनी एम्प्लॉयमेंट चौकात ‘पायोनियर प्रोस्थेटिस्ट अँड ऑर्थोटिक्स सेंटर’ हे छोटेखानी क्लिनिक सुरू केले. सुरुवातीला पोलिओग्रस्त, लकवा, मतिमंद, अपघातग्रस्त रुग्णांना पूरक ठरणारे साहित्य निर्मितीवर त्यांनी भर दिला.

सोलापूर शहर हे कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्याचे प्रवेशद्वार समजले जाते. वैद्यकीय उपचारासाठी सर्वसामान्य लोकांना सोलापूर शहर हे मध्यवर्ती आणि परवडणारे शहर असल्याने महाराष्ट्रासह तीनही राज्यातून सोलापुरात रुग्णांचा लोंढा सदोदित येतच असतो. ८० च्या दशकात सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले शल्यविशारद आणि तज्ज्ञ चिकित्सक असल्याने ब्रॅण्डिंगच्या जमान्या अगोदरही सोलापूर शहर हे एकप्रकारे ‘मेडिकल हब’ म्हणून आकाराला येत होते. प्रोस्थेटिक्स मधील तंत्रशुद्ध पदविका प्राप्त असलेल्या औदुंबर बासूतकर यांच्या ‘पायोनियर प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स सेंटर’ला रुग्णांचा प्रतिसाद मिळू लागला. सर्वसामान्य माणसाला परवडेल अश्या किंमतीत पूरक साहित्य तयार करून देण्यात हातखंडा असलेल्या बासूतकर यांनी कधीही पैश्यासाठी रुग्णांची अडवणूक केली नाही. याउलट सतत बदलते तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा कल राहिला. प्रसंगी दिव्यांग रुग्णांसाठी पूरक साहित्य बनविताना लागणारे रॉ मटेरियल (कच्चा माल) महागात मिळाला तरी देखील स्वतः झळ सोसून ते रुग्णाची गरज पूर्ण करू लागले. यातूनच त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला. औदुंबर बासूतकर हे एकाच वेळी रुग्णप्रिय आणि डॉक्टरप्रिय ठरले. सोलापूर व्यतिरिक्त ठिकाणाहूनही पूरक साहित्यासाठी बासूतकर यांच्या ‘पायोनियर’चे नाव नावलौकीकप्राप्त सर्जनकडून सुचविले जाते यातच सर्वकाही आले. गेल्या चाळीस वर्षांपासून ‘पायोनियर’चा हा रुग्णोपयोगी प्रवास अविरत असा सुरू आहे.

पायोनियरचा नवा आशावाद उत्सव बासूतकर.

औदुंबर बासूतकर यांनी सुरू केलेल्या रुग्णसेवेच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आता त्यांचे सुपुत्र उत्सव बासूतकर सज्ज झाले आहेत. बारावी पर्यंत सोलापुरातच शिक्षण घेतलेल्या उत्सव बासूतकर यांनी प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स मधील पदवी मुंबई येथून प्राप्त केल्यानंतर एम.एस. साठी त्यांनी न्यूझीलंडच्या तोई ओहमाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला. एमएस पूर्ण केल्यावर तिथेच कार्यरत असलेल्या उत्सव बासूतकर यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत न्यूझीलंडमध्ये कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मोठे रुग्णोपयोगी कार्य केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची खरी गरज सोलापूर येथे आहे हे लक्षात आल्याने न्यूझीलंडला कायमचा रामराम ठोकत उत्सव बासूतकर हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोलापुरात परतले. त्यांनी कृत्रिम अवयवाच्या निर्मितीचे अद्ययावत तंत्रप्रशिक्षण घेतलेले असल्याने आता अद्ययावत असे कृत्रिम अवयव सोलापूर सारख्या ठिकाणी सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यासाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, जयपूर सारख्या महागड्या शहरात रुग्णांना जाण्याची आवश्यकता नाही. अगदी जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टसाठी बनविण्यात आलेल्या कार्बन फायबरचे कृत्रिम पाय देखील अगदी वाजवी दरात पायोनियर मध्ये तयार करून मिळतात. ही सर्वात मोठी उपलब्धी मानल्या जाते. अर्थात कृत्रिम अवयव बनविण्यासाठी वापरात येणारे रॉ मटेरियल विदेशातून मागवावे लागत असल्याने सोलापूरसाठी दळणवळणाचा मोठी अडचण सध्या पायोनियर समोर आहे. त्यामुळे सेवेतील तत्परतेला किंचितशी बाधा देखील येवू शकते. मात्र या समस्येवर देखील मात करीत पायोनियरचा प्रवास सुरु आहे. गरजू रुग्णांनी मोबाईल क्रमांक 9356149631 यावर संपर्क साधावा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)