धाडसाला सुरक्षेची हमी हवी

Are you seeking security or adventure?

आजकाल आयुष्यात काही मिळवायचे असेल तर एकदा तरी धाडस हे करायलाच हवे असे म्हणतात. पण मग हे धाडस करण्यासाठी जी सुरक्षितता हवी असते ती कशी मिळणार ? ती कुणी द्यायला हवी ? जो आपल्याला धाडस करायला प्रवृत्त करतो त्याने की आपण आपलीच सुरक्षा करायला हवी. कार रेस किंवा मोटरबाईक रेसमध्ये जिंकण्यासाठी वेगात गाडी चालविण्याचे धाडस हे असावेच लागते. पण ही रेस सुरू असताना अपघात झाला तर…? तुम्हाला प्रायोजित करणारा ग्रुप तुमची जबाबदारी घेणार आहे का ? इन्शुरन्स कंपनी तुम्हाला नुकसानभरपाई देणार आहे का ? हे सर्व बघूनच तुम्ही रेसमध्ये सहभागी व्हाल ना ! आयुष्याचं देखील अगदी तसंच असतं. यश मिळवायचं असेल तर धाडस हे दाखविले पाहिजेच पण पुरेशा सुरक्षिततेसह. धाडसाला सुरक्षेची हमी हवी.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)