आम्ही भारतीय आहोत हीच आमची ओळख आहे…!

Where did your name come from?

Catching the attention of the entire world, Isro’s indian scientists finally landed the chandra gaan 3 (Vikram) safely on the south Pole of moon yesterday. India has become the first country to reach there. Yesterday on August 23rd at 6.04 p.m. Indian scientists made history and took India to the top position in the world in the field of space technology. Today all Indians and overseas Indians of indian descent are proud. Yes we are definitely going to be proud to say that we are Indian and that is our identity. Where did your name come from ? Every indian will now answer this question with a stiff neck. We are Indians and come from India.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत इस्रोच्या भारतीय शास्त्रज्ञांनी अखेर काल संपूर्ण भारतीय बनावटीचे चांद्रयान 3 (विक्रम) हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरविले. तिथे पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. काल दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी बरोबर ६ वाजून ०४ मिनिटांनी हा इतिहास घडवत भारतीय शास्त्रज्ञांनी भारताला अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात अव्वल स्थानावर नेवून ठेवले. आज सर्व भारतीयांची आणि भारतीय वंशाच्या परदेशस्थ भारतीयांची मान अभिमानाने ताठ झाली आहे. होय, आम्ही भारतीय आहोत, हीच आमची ओळख आहे हे सांगताना आम्हाला निश्चित अभिमान वाटणार आहे. विदेशात कुत्सितपणे तुम्ही कुठून आलात ? या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्येक भारतीय ताठ मानेने देईल. आम्ही भारतीय आहोत आणि भारतातून आलो आहोत.

कालचा दिवस (बुधवार) तसा खासच म्हणायला हवा. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 च्या मोहिमेकडे लागलेले होते. भारतात तर घराघरात, गावात, शहरात, वर्तमानपत्रांच्या कार्यालयातून, चौका-चौकातून टीव्ही, स्क्रीन लावून चांद्रयान विक्रमच्या चांद्र भूमीवर सुरक्षितपणे उतरण्याचा सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे लोक बघत होते. उत्सुकता, उत्कंठा, श्वास रोखून धरायला लावणारी रोमांचकता, अभिमान आणि जल्लोषाचे मिश्रण असणारी संध्याकाळ हा तर आपण भारतीय आहोत याची सार्थकता सांगणारा पर्वकाळ होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा अनुपम सोहळा पाहणारी भारतीय पिढी ‘धन्य’ झाली. अगदी १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्याची पहिली पहाट पहात आकाशात फडकणाऱ्या ‘तिरंगा’ ध्वजाला सलामी देण्याचे ‘भाग्य’ लाभलेली भारतीयांची एक पिढी जशी ‘धन्य’ झाली होती. अगदी तीच धन्यता ७५ वर्षानंतर चांद्रयान विक्रमने चंद्राच्या भूमीवर सुरक्षितपणे उतरल्याचा अनुपम सोहळा पाहणाऱ्या आत्ता भारतीयांना होत आहे. “ब्लडी ब्लॅक इंडियन्स” म्हणून हिणवत अनन्वित अत्याचार करीत १५० वर्षाहून अधिक काळ राजवट करणाऱ्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळविणाऱ्या ‘ब्लॅक इंडियन्स’नी गेल्या ७४ वर्षात जी प्रगती साधली त्याचा परिपाक म्हणून ‘या’ क्षणाकडे पाहिले जात होते. जी-20 च्या बैठकीला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे भाषण देखील या सोहळ्याच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आले. आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय शास्त्रज्ञांनी केलेली ही कामगिरी म्हणजे प्रत्येक भारतीयांची नवी ओळख सांगणारी अद्वितीय अशी घटना आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रधर्म आणि राष्ट्रसेवेशी बांधिलकी सांगणारे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ” देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो”. म्हणाल तर हा एक सुविचार आहे. पण अंगिकाराल तर तो राष्ट्रधर्म आहे आणि तीच तुमची ओळख असली पाहिजे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी हाच सुविचार अंगीकारलेला दिसतो. “पृथ्वीकडून चंद्राकडे जाताना मध्ये भारत देश लागतो आणि या देशातूनच चंद्रावर स्वार होता येते” हेच सिद्ध करणारा राष्ट्रधर्माचा आविष्कार घडविला आहे. आता हाच अभिमान आमची ‘ओळख’ बनला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत, हीच आता आमची नवी ओळख आहे.तेंव्हा where did your name come from ? असा प्रश्न कुणी फिरंगी विचारेल तर त्याला ताठ मानेने सांगा….We are Indians…!!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

1

)

  1. gosavimanik123

    “भारताची शान चांद्रयान”
    आम्ही भारतीय आहोत हीच
    आमची ओळख ✍️✍️👌👌💐💐

    Liked by 1 person