मी वेदनेचा पुजारी….हीच ओळख जीवनाची प्रगल्भता दाखवते !

When you know what pain is and you have to choose pain. Then you learn one thing, it’s a decision. Because you have the courage to accept the pain. Otherwise you would have run away from the pain. So automatically the world starts to think of you as ‘brave’ who fights with pain. This addiction teaches you to deal with pain. Until one pain is gone you are looking for another pain. It is this intoxication and this journey that makes you happy. Even pain teaches us to love. Rather than saying that I am a priest of a particular religion, ideology or incarnation of God, the recognition that I am a ‘priest of pain’ shows your depth of life.

जेंव्हा तुम्हाला वेदना काय असते हे कळते आणि तुम्हाला वेदनेची निवड करावी लागते. तेंव्हा तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते की हा एक निर्णय आहे. कारण वेदना स्वीकारण्याचा पर्याय तुमच्यामध्ये असलेल्या धाडसामुळेच तुम्ही स्वीकारता. अन्यथा तुम्ही वेदनेपासून दूर पळाला असता. त्यामुळे आपोआपच जग तुम्हाला वेदनेशी लढणारा धाडसी समजायला लागतो. हीच नशा तुम्हाला वेदनेशी दोन हात करायला शिकविते. एक वेदना संपेपर्यंत तुम्ही दुसऱ्या वेदनेच्या शोधात असता. हीच नशा आणि हाच प्रवास तुम्हाला आनंदित करणारा असतो. वेदनेवर देखील प्रेम करायला शिकविणारा असतो. अमुक एका धर्माचा, विचारधारेचा अथवा ईश्वराच्या एखाद्या अवताराचा मी पुजारी आहे हे सांगण्यापेक्षा मी एक ‘वेदनेचा पुजारी’ आहे ही ओळख तुमची जीवनाविषयीची प्रगल्भता दाखविणारी असते.

दररोज परिचित किंवा अपरिचित माणसांना भेटून हस्तांदोलन करीत त्यांची ‘वेदना’ आपल्या शरीरात घेणारा अवलिया तुम्हाला कधी भेटलाय का ? कदाचित भेटला देखील असेल….त्याला कडकडून आलिंगन देताना तुमची ‘वेदना’ तुमच्या शरीरातून अचानक गडप देखील झाली असेल. तुम्हाला ‘त्या’ अवलियाला भेटून छान वाटलं असेल. त्या नादात तुम्ही हेच विसरला असाल….अरेच्चा ! आपली वेदना कुठे गडप झाली..? तर ती अवलियाने स्वतःच्या शरीरात परावर्तित करून घेतलेली असते. असा एक अवलिया माझा दोस्त आहे. कवी माधव पवार. कधी सोलापूरला आलात तर आवर्जून भेटा. ‘वेदनेचा पुजारी’ असलेला हा अवलिया वेदनाच खातो, वेदनाच पितो…वेदनेच्या कुशीमध्ये निवांत झोप घेतो. कविवर्य कै. रा.ना.पवार यांचा मुलगा म्हणून कवितेचा वारसा रक्तातून आला असं आपण समजू. पण वेदनेचा पुजारी होण्याची ही विरक्त कांक्षा..ती कुठून आली असावी ? माधवाची वेदनासुद्धा कविताच प्रसवते. वेदनेशी झुंज देणाऱ्या माधवाने ‘डायलिसिस’ची किती आवर्तने पार केलीत हे तो जाणे अन हॉस्पिटल जाणे. कदाचित हे सुद्धा तो वर्ल्ड रेकॉर्ड करेल किंवा झालं देखील असेल. कालच्या रात्रीच त्याने १३१८ व्या वेळी ‘डायलिसिस’ ची खेप पूर्ण केलीय. पण वेदनेला सोबत घेवून जगण्याची त्याची आसक्ती प्रबळ आहे. कदाचित स्वतः वेदनेत असतांनाही दुसऱ्याची वेदना समजून घेणारा या पुजाऱ्याच्या भक्तीच्या प्रेमात पंढरीचा पांडुरंग पडला असावा. वेदनेची पूजा बांधून जो जगतो तोच खरा प्रगल्भ जीवन जगतो हे माधव पवार यांच्याकडे पाहिलं की उमजतं.

वेदना ही काही ‘काजळछाया’ नाही की तो विकारही नाही. तर निर्विकार-निश्चलतेच्या मार्गाकडे नेणारा तो एक ध्यानस्थ प्रवास आहे. वेदनेशी एकरूप होणे म्हणजेच समाधिस्थ होणे. ही समाधी अवस्था अनुभवणे हा सुद्धा एक स्वर्गीय आनंदच असतो. गौतम बुद्ध म्हणून तर म्हणतात ‘आधी स्वतःवर विजय मिळवा’. स्वतःवर विजय मिळवायचा म्हणजे सर्व इंद्रियांवर ताबा मिळवायचा. एखादी जखम झाली म्हणून विव्हळत त्याची प्रतिक्रिया नोंदविणे आणि ती जखम बरी होईपर्यंत वेदना सहन करणे म्हणजे ‘वेदनेचा पुजारी’ होत नाही. म्हणूनच जीवघेण्या आजारातून उठला म्हणून प्रगल्भतेचा दृष्टांत झाला असे म्हणता येत नाही. तर आजाराकडे दुर्लक्ष करत वेदनेला आपलेसे करणे यालाच जीवनाच्या प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करणे असं म्हणतात. तोच तर खरा ‘वेदनेचा पुजारी’ असतो.

मुळात कितीही सनातनी किंवा कट्टर समजत असलो तरी आपण स्वतःसाठी एव्हढे कट्टर किंवा सनातनी नसतोच. इतरांवर अधिकार गाजविण्यासाठी किंवा वर्चस्व स्थापित करण्यासाठी आपण अधिक ‘कडवे’ होत असतो. कधी धर्माच्या आडून, कधी जातीच्या आडून तर कधी श्रीमंती किंवा बुद्धिमत्तेच्या आडून आपण आपला कट्टरपणा इतरांवर लादत असतो. यालाच आपण ‘विजयी’ जगणं समजत असतो. माणसांवर किंवा प्राणिमात्रांवर वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे ‘जेता’ बनणे नव्हे. तर शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा मिळविणे म्हणजे खरा ‘विजय’ मिळविणे आहे. यासाठी वेदनेला आपलेसे करून तिचीच पूजा बांधावी लागते. जगाला अन्न पिकवून देणारा शेतकरी राजा खरा ‘वेदनेचा पुजारी’. आस्मानी आणि सुलतानी संकटांना धैर्याने सामोरे जात स्वतःला कर्जाच्या विळख्यात अडकवून घेत वेदनेशी एकरूप होत स्वतःला मातीत गाडून घेतो. त्या मातीतूनच धान्य पिकते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. Manik Gosavi

    🙏🙏✍️✍️

    Liked by 2 people

  2. Rupali

    Kase aahat tumhi?

    Liked by 2 people

    1. मुकुंद हिंगणे

      एकदम मस्त. तुम्ही कश्या आहात ?

      Liked by 2 people