पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार

सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या १८ व्या लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून २०२४ या काळात घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून पुन्हा एकदा मित्रपक्षांच्या सहकार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सलग तिसऱ्या टर्मसाठी सत्तेवर येत आहे. सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गात पावले पडत असताना भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. अर्थात यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी सोपी नसल्याचे उघड झाले. काही राज्यांमधून भाजप महायुतीला मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. याठिकाणी विरोधकांची सरशी झालेली आहे. त्यामुळे १८ वी लोकसभा ही मोदी सरकारसाठी निरंकुश सत्ता नसणार आहे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)