If you live for a purpose, only then will you live for others…!
There are people in the world who spend their lives searching for their purpose. Some of them realize after years of pursuit that they are doing what they wanted to do. But there are also some people who have no purpose to live for. Without a purpose, they spend their lives doing nothing. We are born alone, we live alone, and we will die alone. So why spend life for a purpose…? This is their philosophy of life. But the whole world is with those who spend their lives for a purpose. Therefore, they never consider themselves alone. They live not for themselves, but for others.
जगात असे लोक आहेत जे आपल्या उद्देशाच्या शोधात आपले आयुष्य खर्ची घालतात. त्यांच्यापैकी काहींना वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर जाणवते की त्यांना जे करायचे होते ते ते करत आहेत. पण काही लोक असेही आहेत की ज्यांच्यासमोर जगण्यासाठी कोणताही उद्देशच नाही. उद्देशाशिवाय ते काही न करताही आपले आयुष्य खर्ची घालतात. आपण एकटेच जन्मलो आहोत, आपण एकटेच जगत आहोत, आणि आपण एकटेच मरणार आहोत. मग उद्देशासाठी का आयुष्य खर्च करायचे…? हेच त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान असते. पण उद्देशासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या लोकांसोबत सगळे जग असते. म्हणूनच ते कधीच स्वतःला एकटे समजत नसतात. ते स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगत असतात.

आपण आपल्या बाबतच बोललं पाहिजे, आपल्यातील उणिवा शोधून त्यावर मात केली पाहिजे हे जरी खरं असलं तरी कायम स्वतःबद्दलच बोलत राहिलं तर आपल्याला लोक ‘आत्ममग्न’ समजायला लागतात. शिवाय दुसऱ्यांच्या बाबतीत बोलताना दोन फायदे होतात. एकतर बोलताना नकळत त्याच्यापेक्षा आपण किती उजवे आहोत हे ऐकणाऱ्याच्या मनावर ठसविता येते, आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे त्याची आपल्याला यथेच्छ बदनामी करता येते. ‘चुगली करणे’ हे माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. अश्या माणसांना देखील समाजात ‘विशिष्ट’ स्थान मिळते. कारण समाज म्हणजे माणसांचा समूह असतो. तर अश्या ‘चुगलखोर’ माणसांचा आपल्या चुगली करण्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास असतो. समोरचा व्यक्ती ‘अनर्थ’ घडवायला सहज तयार होईल इथपर्यंत ह्या ‘चुगली’ मध्ये ताकद असते. तर अनर्थ घडवून आणण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, असा समज करून घेत आयुष्यभर ‘चुगली’ हा मनोविकार गोंजारत, वेळप्रसंगी त्याला फुलवत ‘नवनिर्मिती’चा ध्यास न घेता जगणारे अनेकजण आपल्याला भेटतात. विध्वंस करणे हीच त्यांची नवनिर्मितीची संकल्पना असते. त्यालाच ते स्वतःचं कर्तृत्व समजतात. आपण जरी जन्म घेताना एकटे असलो आणि मृत्यूला सामोरे जातानाही एकटे असलो तरी जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ मिळतो ज्याला आपण आयुष्य म्हणतो, ते आपण इतरांच्या सोबत घालवले तरच एकटेपणा आपल्याला शिवत देखील नाही हे ‘चुगलखोरांना’ बहुदा मान्य नसते. आपण इतरांवर केवळ ‘सूड’ घेण्यासाठीच मनुष्यजन्म घेतला असल्याचा त्यांचा अविर्भाव असतो. अश्या ‘चुगलखोर’ व्यक्तीपासून चारहात दूर राहिलात तरच तुम्ही तुम्हाला मिळालेल्या मनुष्यजन्माची ‘सार्थकता’ शोधाल…. कारण ‘सार्थकता’ हेच जगण्याचं ध्येय किंवा उद्दिष्ट्य असू शकते.

जन्म आई-बापाने दिलाय तर मग पोसायची नैतिक जबाबदारी त्यांचीच, त्यांच्याच जीवावर जगाची तोंडओळख व्हायला हवी, त्यांच्याच मेहनतीच्या पैश्यांवर महागडे शिक्षण मिळायला हवे, शिकावे वाटते तेव्हढे शिकल्यानंतर लगेचच बापाने टाचा घासून ओळखीने चांगल्या पदाची आणि पगाराची नोकरी मिळवून द्यावी त्याबरोबरच धनाढ्य सासुरवाडी मिळवून द्यावी हे प्रत्येक आई-बापाचे कर्तव्यच असते. पोसायची हिम्मत नसेल तर जन्माला कश्याला घालायचे…? अशी परावलंबी मानसिकता बाळगणाऱ्या तरुणाईला आयुष्यातील जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष माहीत नसतो. जेंव्हा संघर्षाची वेळ येते तेंव्हा एकतर हे पलायनवाद स्वीकारतात, किंवा आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना आणि परिचितांना दूषणे देत बसतात. उद्याचे यशस्वी आयुष्य मनमुराद जगण्याचे जर स्वप्न पहात असाल तर परिस्थितीनुसार येणाऱ्या संकटांशी संघर्ष करत त्यावर मात करण्याची हिंमत दाखवायला हवी तरच तुम्ही ‘यशस्वी’ म्हणून ओळखले जाल.

आयुष्यात प्रगती, यश आणि समृद्धी मिळवायची असेल तर केवळ अनुकूल परिस्थितीची वाट बघत बसण्यापेक्षा परिस्थिती आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागते. आपल्या अवती-भवती असणाऱ्या समूहात मिसळल्यानंतरच हे शक्य होवू शकते. कारण समूहशक्तीतून परिस्थितीला देखील आपण नमवू शकतो. म्हणूनच एकल किंवा फक्त स्वतःच्याच प्रगतीचा विचार न करता इतरांसाठी आपल्या हृदयात परोपकाराची भावना ठेवली तर निश्चितच आपल्याला जगण्याचे ध्येय किंवा उद्दिष्ट्य सापडते. एकदा का आपले उद्दिष्ट्य ठरले की मग जगण्यातील सार्थकतेचा आपला प्रवास सुसह्य आणि सुखकारक होतो. मनुष्यजन्माला येवून हीच सदगती मिळवायची असते. हीच तर खरी फिलॉसॉफी आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा