Avoid speaking critically in front of children…!
Stop criticizing others while talking in your own home. Especially when your children are present, make a deliberate effort to avoid speaking critically about others. This has a negative impact on children. They unknowingly start imitating you. They also begin to criticize others. Initially, you find this charming. You feel proud that your children think like you. But children who develop the habit of speaking critically from a young age, without any experience or under standing , inadvertently increase their negativity. This affects their growth.
आपल्याच घरात बोलताना दुसऱ्याची आलोचना करणे थांबवा. विशेषतः आपली मुले समोर असताना आपण इतरांबद्दल जास्त टीकात्मक बोलणे मुद्दाम टाळावे. मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ते कळत-नकळत आपलीच नक्कल करू लागतात. सुरुवातीला आपल्याला हे छान वाटते. आपल्या सारखेच आपली मुले विचार करतात याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते. पण कोणताही अनुभव आणि समज नसताना लहानपणापासून टीकात्मक बोलायची सवय करून घेतलेली मुले नकळतपणे त्यांच्यातील नकारात्मकता वाढवितात. याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होतो.

अलीकडे माझा मुलगा नोकरीनिमित्त परदेशी गेल्याने माझे दिवसच पालटले आहेत. एरव्ही माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करणारे चेहरे आता रस्त्यात अडवून मला विचारतात. मध्यमवर्गीयांच्या शहरात असा अनुभव मिळणे रास्तच म्हणायला हवे. कारण विमानाची नुसती घरघर जरी कानावर पडली तरी आकाशातले विमान शोधण्यासाठी गच्चीवर पळत जाणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या सोसायटीत नोकरीसाठी परदेशी जाण्याचे अप्रूप असणारच. तुम्ही मुलावर संस्कारच चांगले केलेत (मुलाची मेहनत गेली उडत) इथपासून तुम्ही त्याचा अभ्यास कसा घेत होता….आमचा मुलगा पण हुशार आहे हो..! लहानपणी खेळणे घेतानासुद्धा तो विमानाचाच हट्ट धरायचा….इथं पर्यंत! लोक मला रोज रस्त्यात अडवून चांगलं तासभर खोळंबा करून गप्पा मारतात. अलीकडे मलाही वाटू लागलंय आपण ऑनलाईन ‘संस्कारवर्ग’ घ्यावेत. कितीही नॉर्मल राहायचा प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून ‘अपेक्षित’ माहिती हवी असते. ती मिळेपर्यंत तो काही आपल्याला सोडत नाही. काल एकाने तर कमालच केली…आपल्या नातवाबद्दल सांगत होता…मोबाईलवर मी कसा शिव्या देतो ते आमचा नातू हुबेहूब नक्कल करून दाखवतो हो..! भयंकर स्मार्ट आहे हो…पुढे चालून नक्कीच तो मोठा ऍक्टर होईल बघा…काय सांगायचं अशा माणसांना…कपाळ !!

:-मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा