घरातील वृध्दांची ‘अडगळ’ का वाटू लागते…?

Why the elderly at home start to seem like a burden…?

When we are young, the elderly members of our household seem perfect to us. But as we grow older, our perspective towards old age starts to change. Those whom seem like a burden as we grow up. This happens because a new generation, which we consider superpowers, arrives. Eventually, a time will come when a new generation that considers us a burden will stand before us. In the end, this can be called the ‘cycle of nature’ concerning humans.

आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा आपल्याला घरातील ज्येष्ठ मंडळी परिपूर्ण वाटत असतात. पण जसजसे आपण मोठे होवू लागतो तसतसे वार्धक्याकडे झुकलेल्या घरातील ज्येष्ठ मंडळी बाबत आपला दृष्टिकोन बदलू लागतो. लहानपणी ज्यांना आपण सुपरपॉवर समजत असतो तेच मोठेपणी आपल्याला ‘अडगळ’ वाटू लागतात. कारण आपल्याला सुपरपॉवर समजणारी नवी पिढी आलेली असते. कधीतरी आपल्याला देखील अडगळ समजणारी नवी पिढी आपल्यासमोर उभी राहणार आहे. शेवटी हे माणसांच्या बाबतीत असणारे ‘निसर्गचक्र’च म्हंटले पाहिजे.

भारतीय संस्कृती आणि संस्कारात वृध्दांना सन्मानाचे स्थान असतानाही बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती, उत्तरदायित्वापासून दूर पळण्याच्या मानसिकतेमधून भारतात गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून वृद्ध लोकांची काळजी घेण्याबाबतची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. २०२४ च्या ताज्या आकडेवारी नुसार भारतात पाच हजाराहून अधिक नोंदणीकृत वृद्धाश्रम आहेत. केवळ कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर पटत नाही हे एकच वृध्दांना घराबाहेर काढण्याचे कारण नाही. तर नातेसंबंधांना प्राधान्य देणाऱ्या भारतीय कुटुंब व्यवस्थेलाच हादरा देणारे अंधानुकरण देखील या समस्येला तेव्हढेच जबाबदार आहे. ही समस्या फक्त सरकार किंवा सामाजिक संस्थांकडून किंवा न्यायालयाकडून सोडविली जावू शकत नाही. तर त्यासाठी कुटुंबवात्सलतेची शिकवण देणारी भारतीय संस्कृती नव्या पिढीत रुजविणे गरजेचे आहे.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)