क्षमा मागण्याची सवय माणसाला जिवंत ठेवते…!

The habit of asking for forgiveness keeps a person alive…!

Expecting others to seek your forgiveness is a mistaken notion. Forgiveness is for yourself because it liberates you. It frees you from the thoughts or topics in which you have imprisoned yourself. When you expect an apology from others, you confine yourself in the dark cell of ego. Ego always thrives in darkness. As it grows in that dark cell, it starts to suffocate you. The only door for entering and exiting that dark cell becomes tightly shut. No matter how much you struggle or scream in that dark cell, you can not open the door. Because your energy has drained, your body lacks the strength to open the door. What happens then ? Gradually, all your bodily movements slow down….Your heart slows down and eventually stops….Consciousness fades from your dulled vision….And after a few moments, the soldiers of ego will tightly chain your ‘life’ and drag it away…..Your heavy eyes will see this scene vaguely, but you won’t be able to resist. Because when consciousness in the body is destroyed, it is declared ‘dead’ in the human world. See….Develop the habit of asking….For forgiveness yourself…!

इतरांनी तुमची क्षमा मागावी हा विचार चुकीचा आहे. क्षमा ही स्वतःसाठी आहे. कारण ती तुम्हाला मुक्त करत असते. ज्या विषयात अथवा विचारात तुम्ही स्वतःला बंदिस्त करून ठेवले आहे, त्यातून ती तुमची मुक्तता करत असते. इतरांकडून तुम्ही जेंव्हा क्षमायाचनेची अपेक्षा करता तेंव्हा तुम्ही स्वतःला अहंकाराच्या अंधाऱ्या कोठडीत बंदिस्त करून घेत असता. अंधारात नेहमीच अहंकाराचे साम्राज्य वाढत असते. तो त्या अंधाऱ्या कोठडीत जसजसा वाढू लागतो, तसतसा तुमचा श्वास गुदमरायला लागतो. त्या अंधाऱ्या कोठडीत प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्यासाठी असलेले एकमेव दार देखील गच्च होते. त्यामुळे तुम्ही त्या अंधाऱ्या कोठडीतून कितीही धडपडलात, किंवा किंचाळलात तरी देखील तुम्ही ते दार उघडू शकत नाही. कारण तुमचा शक्तिपात झाल्याने दार उघडण्यासाठी लागणारी पुरेशी शक्ती देखील तुमच्या शरीरात नसते. अश्यावेळी काय होणार ? हळूहळू तुमच्या सर्व अवयवांची हालचाल मंद होत जाणार….तुमचे हृदय मंद होत कायमचे बंद पडणार…..जडावलेल्या दृष्टीतून चेतना नष्ट होत जाणार…..काही क्षणानंतर अहंकाराचे सैनिक तुमचा ‘प्राण’ साखळदंडात करकचून बांधून फरफटत नेणार…..जडावलेल्या तुमच्या डोळ्यांना हे दृश्य अस्पष्टपणे दिसणार…..पण तुम्ही प्रतिकार करू शकणार नाहीत. कारण शरीरातील चेतना नष्ट झाली की मानवी जगात त्याला ‘मृत’ घोषित करतात…..बघा….सवय करा…..स्वतः क्षमा मागण्याची….!

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

3

)

  1. Priti

    I don’t have my ego while asking for forgiveness from others if I do some mistake i think it makes our mind pure ! Well shared

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      Thanks Priti 🙏🙏🙏

      Liked by 1 person

      1. Priti

        💐

        Liked by 1 person