Why Do We Count The Days Off ?

आपण सुट्ट्यांचे दिवस का मोजतो…?

We often start counting the upcoming holidays even before the week begins. A quick glance at the calendar, and we already know which holidays are coming, apart from the regular Sunday off. We do this because we have to complete a week’s worth of week in the remaining days. This habit is common among middle-class employees. But did you know one thing ? When anything is done slowly, the result is usually better. Or to put it  another way, doing things slowly allows us to di them better and enjoy them more. This is what truly living life means. Simply rushing around and overworking doesn’t bring you the joy of living; it only makes you stressed and perpetually unhappy.

Nowadays, a new trend called the “corporate funda” has become widespread. It means that even when you’re at home, you’re still working online. This approach has been adopted at all levels in the pursuit of increasing productivity. However, the principal of working slowly but achieving good results can be applied not just at work but in every aspect of life- from eating, dating, love and marriage, to parenting, and finally to your work. Try it ! See if you don’t experience the joy of truly living a good and fulfilling life. Then you won’t even feel the need to count the days off…..!

आठवड्यात येणाऱ्या सुट्ट्या ह्या आठवडा सुरू होण्यापूर्वीच मोजल्या जातात. कॅलेंडरवर सहज नजर टाकली तरी आपण त्यात हक्काची रविवारची सुट्टी सोडून इतर येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या आहेत ? याची आठवडा सुरू होण्याआधीच माहिती घेतो. कारण उरलेल्या कामाच्या दिवसात आपल्याला आठवडाभराचे काम उरकायचे असते. ही प्रत्येक मध्यमवर्गीय नोकरदाराची नित्याची सवय आहे. पण एक गोष्ट माहीत आहे का ? कोणतीही गोष्ट हळूगतीने केली की तिचा रिझल्ट चांगला येतो. किंवा फारतर आपण असं म्हणू शकतो की, कोणत्याही गोष्टी हळूगतीने केल्याने त्या अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात आणि त्यांचा अधिक चांगल्या पद्धतीने आनंद घेता येतो. यालाच खऱ्या अर्थाने जीवन जगणे म्हणतात. केवळ धावपळ करणे, अतिश्रम करणे यातून तुम्ही जगण्याचा आनंद मिळवू शकत नाही. तर तुम्ही फक्त तणावग्रस्त होवून कायमचे दुःखी बनता.

आजकाल “कार्पोरेट फंडा” नावाचा नवा प्रकार सर्वत्र रूढ झाला आहे. म्हणजे तुम्ही घरी असाल तरीही तुम्ही ऑनलाईन कामच करत राहणार आहात. उत्पादन क्षमता वाढविण्याच्या नादात हा फंडा सर्वच  स्तरावर वापरला जावू लागला आहे.  हळूगतीने पण चांगला रिझल्ट देणारे काम करायचे हे सूत्र तुम्ही फक्त नोकरीच्या ठिकाणीच नाही तर सर्वच ठिकाणी लागू करू शकता. अगदी जेवणापासून ते डेटिंग, प्रेम-लग्न, पालकत्व आणि शेवटी आपल्या कामापर्यंत. मग बघा ! तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगले आनंददायी जीवन जगल्याचा आनंद मिळतो की नाही. मग तुम्ही सुट्ट्यांचे दिवस पण मोजणार नाहीत…..!

:-Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)