Apply Sales Management Principles to Life…!

विक्री व्यवस्थापनाचे सूत्र आता जगण्यात वापरा….!

  • Nowadays, we see that governments of various countries are struggling with the increasing issue of unemployment. The reason is that unemployment is growing at a pase that governments cannot match by creating jobs quickly enough. This leaves the private sector, which has seized this opportunity to create more jobs. However, it has become clear that most of these new jobs are not in manufacturing but in sales and marketing. This is because automation has taken over the manufacturing sector. Therefore, the majority of jobs provided by the private sector worldwide are now in sales rather than production. Additionally, private companies have set sales targets for the candidates they hire and provide salaries and benefits based on achieving these targets.
  • This approach has now become away of life. It’s as if every person has a sign around their neck that reads, “Increase my value”. The same techniques you use to enhance a product’s value and sell it to a customer should now be applied to your personal life. Continuously work on increasing the value of others, and in turn, your own life will improve. Along with this, you will receive good bonuses and incentives, enabling you to provide a comfortable life for your family.
  • आजकाल वाढत्या बेरोजगारी पुढे कोणत्याही देशाचे सरकार हतबल झालेलेच पहायला मिळते. कारण ज्या वेगाने बेरोजगारी वाढतेय त्या वेगाने सरकार त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देवू शकत नाही. राहता राहिला प्रश्न तो खासगी क्षेत्राचा. खासगी क्षेत्राने या संधीचा फायदा घेत नोकऱ्या निर्माण करण्याचे प्रमाण वाढवले. पण त्या वाढलेल्या नोकऱ्या ह्या उत्पादन निर्मितीच्या क्षेत्रापेक्षा विक्री आणि विपणन क्षेत्रात अधिक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण उत्पादन निर्मितीच्या क्षेत्रात ऑटोमेशन आले आहे. म्हणजेच सध्या जगभरात खासगी उद्योग क्षेत्रातून मिळणाऱ्या नोकऱ्या ह्या निर्मिती क्षेत्रापेक्षा विक्री क्षेत्रातील अधिक आहेत. त्याबरोबर खासगी क्षेत्राने नोकरीसाठी नेमलेल्या उमेदवारांपुढे उद्दिष्ट्य ठेवले. उद्दिष्ट्यपूर्ती प्रमाणेच त्यांना वेतन आणि सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
  • आता हेच सूत्र जगण्याची भाषा बनले आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यात एक पाटी लावलेली आहे. त्यावर लिहिलेले आहे “माझे महत्व वाढवा”. तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचे महत्व वाढवून ग्राहकाला विकण्याचे जे तंत्र शिकलात तेच तंत्र तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात वापरायचे आहे. तुम्ही इतरांचे महत्व वाढवत चला, आपोआपच तुमच्या आल्हाददायक जगण्याच्या सुविधा वाढत जातील. सोबत तुम्हाला बोनस आणि इनसेंटिव्ह देखील चांगला मिळेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुखसुविधा द्यायला तुम्ही समर्थ होता.

:- Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)