प्रेम हे निव्वळ दुधारी तलवारी सारखे असते…!
Expressing love can be as exhilarating and intense as it can be terrifying. Developing feelings for someone due to attraction is a natural process, but the true blossoming of love is only understood once it is expressed. Until love is voiced, it remains dreamy and poetic. However, once love is expressed, it often leads to a fierce competition to assert control over one another. What begins as a game of physical attraction can eventually turn into a primal struggle to gain possession over the body. We see such stories around us every day. That’s why it’s said that love is like a double-edged sword. Before falling in love, think about the potential future consequences. If destiny has danger in store for you through love, and if that danger comes to pass, ensure you have one strong side of your life secured so that the lives of you and those dependent on you are not drastically affected. At the very least, do that much.

प्रेम व्यक्त करणे हे जितके रोमांचकारी आणि उत्कट असते तेव्हढेच ते भयानक देखील असू शकते. आकर्षणापोटी एखाद्यावर प्रेम जडणे ही अगदी सहज नैसर्गिक क्रिया आहे. पण हे प्रेम व्यक्त केले जात नाही तोपर्यंतच त्याचे खरे उमलणे समजू शकत नाही. म्हणूनच म्हणतो की, जोपर्यंत प्रेम अव्यक्त आहे तो पर्यंतच ते प्रेम स्वप्नमय आणि काव्यमय राहू शकते. एकदा का प्रेम व्यक्त झाले की मग सुरू होते एकमेकांवर अधिकार दाखवण्याची जीवाची स्पर्धा. शरीराच्या आकर्षणातून सुरू झालेला हा खेळ शेवटी शरीरावर ताबा मिळविण्यापर्यंत पाशवी होतो. आपण आपल्या अवतीभवती असे किस्से रोजच बघतो. म्हणूनच म्हणतो की प्रेम हे दुधारी सूरी सारखे असते. भविष्यकालीन परिणामांचा विचार करूनच प्रेम करा. समजा तुमच्या नशिबात प्रेमामधून धोकाच मिळणार असेल आणि तसे घडले तर तुमची जगण्याची एक बाजू भक्कम ठेवा, ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या
लोकांच्या आयुष्यावर फार फरक पडणार नाही. निदान एव्हढे तरी कराच.

:-Mukund Madhukar Hingne.
यावर आपले मत नोंदवा