नातेसंबंध बिघडायला माणसाची वृत्ती कारण ठरते….!
- “so, you know….He shows a lot of attitude, he’s overly proud of his intelligence”, is a conversation that inevitably comes up at least once during the day. Sometimes we say this about someone behind their back, or they might say it about us. Generally, this kind of statement often marks the beginning of discussions about relationships we maintain for the sake of practicality, even when we don’t really get along. In our daily lives, attitude has become that significant.
- The question, “what will people say ?”rooted in fear, and “what do people do ?”driven by unnecessary curiosity, are reflective of people’s attitudes towards each other in social life. As a result, a person’s attitude has become more important than their past, education, wealth, or circumstances. It’s because attitude has grown larger than natural traits or skills that sweetness in relationships can no longer be sustained. Even when behavior is good, our attitude toward someone sometimes flares up. Why does this happen ? Often, it’s because, at some point, that person has hurt us, and the bitterness we feel toward them is revealed through our body language.
- There’s only one solution to this: the moment something happens that goes against our will, we should forget it instantly. But this is easier said than done because we can’t forget the insults we’ve endured or anticipate. If only nature had given us a mechanism in our brain to produce a bacteria that could make us forget insults…….

- “तो ना….तो फारच attitude दाखवतो, त्याला त्याच्या हुशारीचा फारच माज आहे”, हा संवाद दिवसभरात एकदा का होईना उच्चारला जातोच. कधी आपण स्वतः दुसऱ्या बद्दल बोलताना त्याच्या पश्चात हा संवाद बोलतो, कधी तो आपल्या बद्दल बोलताना हा संवाद उच्चारतो. एकूणच एकमेकांना स्वभाव पटत नसताना देखील व्यवहारिक हित जपायचे म्हणून जी नाती टिकवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या नात्याबद्दल बोलताना या संवादानेच बहुतेक वेळा सुरुवात केली जाते. आपल्या रोजच्या जीवनात attitude ला एव्हढे महत्व आले आहे.
- लोक काय म्हणतील ? हा भीतीयुक्त प्रश्न आणि लोक काय करतात ? हा विनाकारण चौकशी करणारा प्रश्न माणसांच्या सामाजिक जीवनात एकमेकांची वृत्ती दर्शविणारा प्रश्न आहे. त्यामुळे भूतकाळापेक्षा, शिक्षणापेक्षा, पैशापेक्षा, परिस्थिती पेक्षा माणसांची वृत्ती अधिक महत्वाची ठरत आहे. नैसर्गिक गुणधर्मापेक्षा किंवा कौशल्या पेक्षाही माणसाची वृत्ती मोठी झाल्यानेच आज एकमेकांच्या संबंधात गोडवा राहू शकत नाही. बऱ्याच वेळा वागणूक चांगली असली तरी मध्येच एखाद्या बद्दल आपली वृत्ती उफाळून येते. हे असं का होतं ? कधीतरी-कुठेतरी त्याने आपल्याला दुखावलेले असते . म्हणूनच त्याच्या बद्दल असलेला तिरस्कार आपल्या देहबोलीतून व्यक्त होताना आपली वृत्ती उघड होते.
- यावर एकच उपाय आहे…… ज्यावेळी अशी मना विरुद्धची घटना घडते, त्याचक्षणी ती विसरली पाहिजे. पण हा उपाय अंमलात येवू शकत नाही. कारण आपण आपला झालेला किंवा होणारा अपमान विसरू शकत नाही. अपमान विसरायला लावणारा बॅक्टेरिया जर मेंदूत तयार होण्याची प्रक्रिया जर निसर्गाने दिली असती तर…….

:-Mukund Madhukar Hingne.
Leave a reply to Veronique उत्तर रद्द करा.