“The dishes made by my mother are always our first love…!”

आईने बनवलेले पदार्थ हीच आपली पहिली आवड असते…!

What are your favorite types of foods?

“After birth, it is our mother who breastfeeds us. She is the one who first feeds us solid food, giving us the first sense of taste. The foods she introduces to us become our first favorite dishes. Even though our likes and dislikes may change as we grow, the fondness she instills in us for certain foods remains on our palate forever. The taste of the dishes made and fed by our mother is superior to even the best delicacies in the world. This truth is universally acknowledged.”

  • “The love and energy from our mother’s heart, who cares for us with immense effort, precision, and affection, are infused into the dishes she prepares. This is why even a five-star hotel chef cannot match the taste of her food.
  • At the exact time when we are hungry, our mother can simply create a dish using whatever ingredients are available nearby. That’s why no matter how famous or wealthy a person becomes, their favorite foods often remain simple. There isn’t a person in the world who doesn’t love a dish made by their mother (excluding those men who are now under the influence of their wives).
  • Being a Maharashtrian, I have a deep love for traditional Maharashtrian vegetarian dishes. Especially, if the meal includes ‘Pithla-Bhakri and Mirchi cha Thecha,’ along with ‘Varan-Phal,’ I feel like I’m experiencing the food of paradise. I don’t even dream of traveling abroad for tourism, and the reason behind this is my love for my own cuisine and the language barrier. I could consider taking a translator with me to understand the language, but what if I don’t find the Maharashtrian vegetarian food I love? This is the real reason why I can’t currently think about going to Japan to visit my son, who is working there.”

जन्मल्यानंतर स्तनपान करणारी आपली माता असते. तीच आपल्याला पहिल्यांदा अन्नाचा घास भरवते. चवीची जाणीव तीच आपल्याला पहिल्यांदा करून देते. ती जे खावू घालते तेच आपले पहिले आवडते पदार्थ बनतात. पुढे आपल्या आवडी-निवडी बदलत गेल्या तरी आईने निर्माण करून दिलेली आवड हीच आपल्या जिभेवर कायम असते. आईने बनवून खाऊ घातलेल्या पदार्थाची चव जगातल्या सर्वोत्तम खाद्यपदार्थापेक्षाही सर्वश्रेष्ठ असते. हेच सत्य जगाला मान्य आहे.

  • अतिशय कष्टाने, हिशोबाने पण प्रेमळपणे सांभाळ करणाऱ्या आपल्या आईच्या हृदयातील वात्सल्य आणि तिच्या गतिमान हातातील ऊर्जा तिने बनवलेल्या पदार्थांमध्ये मिसळलेली असते. म्हणूनच तिच्या हातून बनलेल्या पदार्थांची बरोबरी पंचतारांकित हॉटेलमधील शेफ देखील करू शकत नाही.
  • आपली आई अगदी आपल्या भुकेच्या वेळी जवळपास मिळणाऱ्या खाद्य वस्तूंमधूनच अगदी साधेपणाने आपल्यासाठी पदार्थ बनवून देते. त्यामुळेच माणूस कितीही प्रसिद्ध किंवा श्रीमंत असला तरी त्याची खाद्यपदार्थांची आवड मात्र अतिशय साधी असते. जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला आईच्या हातून तयार झालेला खाद्यपदार्थ आवडला नसेल. (आता बायकोच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पुरुषांना वगळून)
  • मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला महाराष्ट्रीयन पद्धतीचे शाकाहारी पदार्थ प्रचंड आवडतात. त्यातल्या त्यात “पिठलं-भाकरी आणि मिरचीचा ठेचा” या बरोबरच “वरणफळ” हे पदार्थ ताटात असतील तर स्वर्गातील भोजनाची रंगत मी अनुभवतो. मी परदेशात पर्यटनाला देखील जाण्याचे नुसते स्वप्न देखील बघत नाही. त्याला कारण माझी खाद्यपदार्थांची आवड आणि माझ्या भाषेची अडचण हे दोनच अडथळे आहेत. एकवेळ भाषा समजून घेण्यासाठी मी दुभाषी सोबत घेईन पण मला आवडणारे महाराष्ट्रीयन पद्धतीचे शाकाहारी भोजन मिळाले नाही तर…? मी जपानमध्ये जॉब करणाऱ्या माझ्या मुलाला भेटायला जपानला जायचा विचार सध्या करू शकत नाही यामागे हेच खरे कारण आहे.

:-Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)