“रात्री झोप येईल एव्हढे कष्ट तर करायलाच हवेत…!“
In what ways does hard work make you feel fulfilled?
Just as everyone’s happiness is different, so are their struggles. Some people engage in physical labor, while others in intellectual work. In other words, every kind of work involves effort. So, how does one find satisfaction from their hard work? Satisfaction can be achieved in many ways, but there’s no greater satisfaction than falling asleep as soon as you lie down at night. I work on my writing until at least 1:30 AM every night, but once I finish and lie down, I fall into a deep sleep within seconds. This is how I measure the satisfaction from my work.
जसं प्रत्येकाचं सुख वेगळं असतं, तसंच प्रत्येकाचे कष्ट देखील वेगळे असतात. कुणी शारीरिक कष्ट करतात तर कुणी बौद्धिक कष्ट करतात. म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या कामात कष्ट हे असतातच. मग कामासाठी केलेल्या कष्टाचे समाधान कोणत्या प्रकारे मिळत असेल ? तर कष्टाचे समाधान अनेक प्रकारे मिळू शकते. पण रात्री अंथरुणात पडल्या-पडल्या झोप लागण्यासारखे समाधान दुसरे कोणतेच नसते. मी रोज रात्री किमान दीड वाजेपर्यंत लिखाण काम करत असतो. पण काम संपवून अंथरुणात पडलो की दुसऱ्या सेकंदाला मी गाढ झोपलेला असतो. मी माझ्या कामातील समाधानाचे मूल्यमापन असे करतो.

:-Mukund Madhukar Hingne.
यावर आपले मत नोंदवा