“When my father had a heart attack, it was the first time I realized the weight of responsibility…!”

“वडिलांना अटॅक आला त्यावेळी पहिल्यांदा जबाबदारीची जाणीव झाली…!”

When was the first time you really felt like a grown up (if ever)?

Even as a child, despite receiving praise, there’s always a lingering feeling that makes us uneasy. While our family members, especially our parents, appreciate us on one hand, they constantly remind us that we are still children. They restrict us from traveling alone or going out, granting permission only if someone accompanies us. This often leads to frustration, and we become impatient, eagerly waiting to grow up. But what does it really mean to grow up? We don’t fully understand that yet. Then, something happens in the family that deeply affects us, and suddenly, the time comes when we must shoulder responsibilities. For the first time, we feel like we’ve truly grown up. Especially when the head of the family, like our father, who handles all duties with responsibility, suddenly passes the burden onto us, we become aware of the reality. It’s at that moment we wake up to the fact that the weight of all those responsibilities now rests on our shoulders, and even the other family members begin looking at us with expectations.

  • While pursuing my college education, I had already started earning through small jobs. I made enough to cover my own expenses. However, I never had to take responsibility for the household finances. At that age, my only concern was earning just enough for my own needs. Hence, I never thought about how to manage the daily expenses for household items.
  • My father, who worked as an engineer at a sugar factory, even after his retirement, was more concerned about how I would settle in life. After retiring in 1993, he came to live with me. By then, I had left my small jobs and entered the newspaper industry. It was a period where I was striving to prove myself in journalism. Since I was often out of the house due to work, my father took care of the household responsibilities, which kept him occupied as well.
  • The next two years passed by happily. In 1995, while my father was asleep at home, he suffered a heart attack around midnight. This was the first time something like this had happened, and no one in the house could recognize it as a heart attack. I was on duty at the time, and my mother was waiting for me to return home. There were no mobile phones back then, so it wasn’t until I arrived home that I saw my father in a critical condition. We rushed him to the hospital and started his treatment.
  • In the morning, the doctor treating my father handed me a list of injections that were needed. With only a small amount of money in my pocket, I had to buy expensive injections and medicines. I finally informed my colleagues and boss about the situation. By then, I had realized that the hospital expenses were beyond my capacity. My boss and all my colleagues pooled together their one-day salary and gave it to me. This is something that remains etched in my memory. I faced the situation with courage. From the time my father was admitted to the hospital until he returned home safely, the expenses had amounted to lakhs. It was the first time I had to ask my colleagues for money.
  • After bringing my father home, it took me three years to repay the borrowed money. Following this incident, many changes occurred in me. I, who had previously lived carelessly without any seriousness, became much more responsible. Everyone noticed this transformation in me. I truly realized that I had grown up.

लहानपणी आपले कौतुक होत असतानाही एक जाणीव आपल्याला कायम अस्वस्थ करत असते. आपण लहान असल्याने घरातील सर्व सदस्य विशेषतः आपले आई-वडील एकीकडे कौतुक करत असले तरी आपण लहान असल्याची सतत जाणीव करून देत असतात. आपल्याला एकट्याने प्रवास करायला, फिरायला जायला देखील मनाई करत असतात. कुणीतरी सोबत असेल तरच परवानगी देतात. त्यामुळे आपली सतत चिडचिड होत असते. केंव्हा एकदा आपण मोठे होवू, याची घाई झालेली असते. पण मोठे होणे म्हणजे नेमकं काय असतं ? हे कुठे आपल्याला माहीत असते. घरात एखादी अशी घटना घडते की त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. तेंव्हा मात्र घरातील जबाबदारी घेण्याची वेळ आपल्यापुढे येते आणि पहिल्यांदा आपल्याला वाटते की खरोखरच आपण मोठे झाले आहोत….विशेषतः घरातील कर्ता पुरुष म्हणून आपले वडील जसे सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून पूर्ण करत असतात. त्यांच्या ऐवजी आपल्यावर जेंव्हा सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे येते, तेंव्हा पहिल्यांदा आपण भानावर येतो. घरातील इतर सदस्य देखील तुमच्याकडे अपेक्षेने पहायला लागतात.

  • महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी छोट्या नोकऱ्या करत स्वकमाई सुरू केली होती. स्वतःचा खर्च भागविण्या इतपत मी कमाई करत होतो. तरी देखील घरातील अर्थकारण सांभाळण्याची माझ्यावरबकधी वेळ आली नव्हती. आपल्याला लागणाऱ्या खर्चापूरते पैसे कमवायचे एव्हढाच विचार त्या वयात असायचा. त्यामुळे घरातील दररोज लागणाऱ्या चिजवस्तूंचा खर्च कसा भागवायचा ? हा प्रश्नच मला कधी पडत नव्हता.
  • साखर कारखान्यात अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या आमच्या वडिलांनी त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर देखील मी कसा स्थिरावेन याचीच काळजी केली. १९९३ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्याकडे रहायला आले. त्यावेळी छोट्या नोकऱ्या करण्याचे सोडून मी वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश केला होता. तो काळ पत्रकारितेत मला स्वतःला सिद्ध करण्याचा काळ होता. मी सतत कामानिमित्त घराबाहेर असल्याने वडीलच घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यात त्यांचा वेळही चांगला जात होता.
  • पुढची दोन वर्षे खूप मजेत गेली. १९९५ मध्ये वडिलांना घरातच झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. हा पहिलाच धक्का होता. त्यामुळे घरात कुणाला कळू शकते नाही की हाच हृदयविकाराचा धक्का आहे. मी त्यावेळी ड्युटीवर होतो. मी घरी येण्याची वाट आई पहात होती. तेंव्हा मोबाईल नव्हता. त्यामुळे मी घरी पोहोचल्यावरच वडिलांना अत्यवस्थ अवस्थेत पाहिले. लगेच हॉस्पिटल गाठले आणि त्यांचे उपचार सुरू केले.
  • सकाळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या हातात लागणाऱ्या इंजेक्शनची यादीच दिली. खिश्यात मोजकेच पैसे असताना मला महागडी इंजेक्शन्स आणि औषधे आणायची होती. शेवटी ऑफिसमधील सहकारी आणि बॉसला कळविले. हॉस्पिटल खर्च पेलवणारा नसल्याचे एव्हाना लक्षात आले होते. बॉस सहित सर्व सहकाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार गोळा करून मला दिला. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहणारी ठरली होती. मी देखील धाडसाने त्या घटनेला सामोरे गेलो. वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून सुखरूप परत घरी येईपर्यंत लाखोंचा खर्च आला. पहिल्यांदाच सहकाऱ्यांकडे पैसे मागण्याची वेळ माझ्यावर आली होती.
  • वडिलांना घरी आणल्यानंतर पुढे तीन वर्षे मी उसणे घेतलेले पैसे परत करत होतो. या घटनेनंतर माझ्यात अनेक बदल होत गेले. कोणतेही गांभीर्य न बाळगता बेफिकीरीने जगणारा मी खूप गंभीर झालो. माझ्यातले हे बदल सगळ्यांच्या लक्षात येत होते. मी आता मोठा झालोय हे खरोखरीच मला मनोमन पटले होते.

:-Mukund Madhukar Hingne.

Leave a reply to veerites उत्तर रद्द करा.

Comments (

4

)

  1. veerites

    प्रिय मुकुंदराव,
    अगदी बरोबर. तुम्ही त्यांची सेवा केलीत हे किती मोठे भाग्य! आम्ही खूप दुर्भागी आहोत. अटॅक ने ते गेले आणि मग मी त्यांना घेऊन आलो.
    तुमच्या विषयीचा आदर द्विगुणीत झाला!
    Thank you very much for liking my post on started cycling 🚴‍♀️🙏🌼

    Liked by 1 person

  2. मुकुंद हिंगणे

    🙏🙏🙏

    Liked by 1 person

  3. veerites

    Thanks for liking my post, Bidding Bye 🙏

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      🙏🙏🙏

      Liked by 1 person