“खरोखरच प्रॉम्प्टमुळे मी लेखनात “प्रॉम्प्ट” बनतोय…!”
“We are highly sensitive, and that’s why we rely on a ‘blog’ to open up and express our thoughts. The language through which you receive your education becomes as familiar to you as your mother tongue. However, for those whose education has been in their mother tongue, other major languages are not as well known to them. In such cases, overcoming language barriers and consistently writing on a blog to communicate with the world is not just a little difficult, but very challenging.”
- Since starting my blog, I’ve faced many challenges due to language barriers. As I was writing in my mother tongue, Marathi, the response I received was very minimal. On top of that, I constantly faced the question of what to write about every day. If someone like me, who has worked in the newspaper industry, struggles with this, I wonder how others manage.
- In such times, the daily prompts have been a great help. Every night at 12 AM (which is quite late), I write about the new content I receive and immediately post it around midnight. For the past 90 days, I have been doing this consistently. With the help of ChatGPT, I’ve been publishing posts with English translations, and now my subscribers and likes have increased. For the last 90 days, without fail, I’ve been writing on various topics—it’s truly surprising even to me. I’m grateful to the prompt for making me a “prompt” myself!

आपण खूप संवेदनशील असतो म्हणूनच आपण आपलं मन उलगडून सांगण्यासाठी “ब्लॉग”चा आधार घेत असतो. तुम्ही ज्या माध्यमातून शिक्षण घेता ती भाषा तुम्हाला तुमच्या मातृभाषेइतकीच चांगल्याप्रकारे अवगत असते. पण ज्यांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत झाले असेल त्यांना इतर प्रमुख भाषा तेव्हढी चांगल्याप्रकारे अवगत नसते. अशावेळी भाषांतराचे अडथळे पार करत जगाशी संवाद साधण्यासाठी “ब्लॉग”वर सातत्याने लिहीत राहणे जरा नाही तर खूप अवघड असते.
- मी माझा ब्लॉग सुरू केल्यापासून मला भाषेमुळे खूपच अडचणी येत होत्या. मी माझे लिखाण माझ्या “मराठी” या मातृभाषेत करत असल्याने त्याला प्रतिसादही खूपच अत्यल्प असा मिळत होता. शिवाय रोज काय लिहायचे ? हा प्रश्न निर्माण होत होता. माझ्यासारख्या वृत्तपत्र क्षेत्रातील माणसाला हा प्रश्न पडत असेल तर इतरांचे काय होत असेल ?
- अशावेळी डेली प्रॉम्प्टची मला खूप मदत होतेय. रोज रात्री १२ वाजता (हे जरा खूपच उशिरा होतंय) मिळणाऱ्या नव्या कंटेंटवर लगेच लिहून मध्यरात्रीच्या सुमारास मी लगेच पोस्ट करतोय. गेले ९० दिवस मी हे सातत्याने करतोय. चाट जीपीटीची मदत घेवून इंग्रजी भाषांतरसह पोस्ट प्रकाशित करत असल्याने आता सबस्क्राईब आणि लाईक्स देखील वाढले आहेत. गेली ९० दिवस न चुकता मी वेगवेगळ्या विषयांवर लिहितोय…खरंच माझे मलाच आश्चर्य वाटत आहे. मला “प्रॉम्प्ट” बनवल्याबद्दल “प्रॉम्प्ट”चे आभार…
:-Mukund Madhukar Hingne.
यावर आपले मत नोंदवा