How do you manage screen time for yourself?
At our place, we call the TV the “idiot box.” What do you call it? My family and I have come to believe that serials with misguided plots and mediocre quality filming have become a severe mental illness affecting society. I don’t know how much you would agree with this view. But the TV, which we once bought with great enthusiasm and to show off (our taste and wealth) to others, has been neatly packed away in a box and kept in storage for the past eight years.
Around 1984, television became widely accessible in households across India. Until then, TVs were seen only in the homes of wealthy people in a few major cities. When black-and-white TVs entered the homes of the common people across the country, our generation was young. Naturally, there was a curiosity about this new technology. So, with a lot of insistence to my father, we brought a TV into our home. We would spend hours in front of it, watching the World Cup football, cricket matches, and some well-written serials. Back then, the TV had almost become a member of the family.
As time passed, the importance of TV also changed. Now, in the commercial competition between various channels, the race for TRP has started wasting viewers’ time daily. These days, the TV is viewed more as a decorative piece in the house. It is now turned on only for watching the daily news or matches. We switched it off during our son’s 12th-grade board exam studies, and after that, we got used to not having it on. Now, we don’t miss having the TV on at all. Instead, the free time we gained has increased conversations at home. We’re now able to spend quality time together, strengthening our relationships. We have consciously removed TV from our lives.

“खूप वर्षे झालीत घरातील टीव्ही बंद केलाय….!”
टीव्हीला आमच्याकडे “इडीएट बॉक्स” म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ? भरकटलेले कथानक आणि सुमार दर्जाचे चित्रीकरण असलेल्या सिरियल्स हा एक समाजाला लागलेला भयंकर असा मानसिक आजार आहे, हे मत माझं आणि माझ्या कुटुंबाचं झालं आहे. मला माहित नाही तुम्ही कितपत माझ्या या मताशी सहमत असाल. पण कधीकाळी आवडीने आणि दुसऱ्याला रुबाब (रसिकता आणि श्रीमंतीचा) दाखविण्यासाठी आणलेला टीव्ही गेल्या ८ वर्षांपासून आम्ही बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून अडगळीत ठेवला आहे.
भारतात साधारणतः १९८४ च्या सुमारास टीव्ही सर्वदूर घराघरात पोहोचला. तोपर्यंत टीव्ही फक्त देशातील मोजक्या महानगरांमधून श्रीमंत लोकांच्या घरात दिसत होता. देशभरात सर्वसामान्यांच्या घरातून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जेंव्हा आला तेंव्हा आमची पिढी तरुण होती. साहजिकच नव्या तंत्राचे कुतूहल होते. त्यामुळे आपल्याही घरात टीव्ही असावा म्हणून वडिलांकडे हट्ट करून टीव्ही आणला होता. वर्ल्डकप फुटबॉल, क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी याबरोबरच काही चांगल्या कथानकाच्या सिरियल्स पाहण्यासाठी टिव्हीपुढे तासनतास आम्ही बसून रहायचो. त्याकाळी टीव्ही हा कुटुंबातील एक सदस्य झाला होता.
काळ बदलत गेला तशी टीव्हीचे महत्वही बदलत गेले. आता वेगवेगळ्या चॅनल्सच्या व्यावसायिक स्पर्धेत टीआरपीची जीवघेणी शर्यत रोज दर्शकांचा वेळ वाया घालवू लागली आहे. अलीकडे टीव्हीकडे घरातील एक शोभेची वस्तू म्हणून पाहिले जाते. आता टीव्ही हा रोजच्या बातम्या आणि मॅचेस पाहण्यासाठी तेव्हढ्यापुरताच लावला जातो. आम्ही तर मुलाच्या बारावीच्या बोर्डाच्या अभ्यासाचे निमित्त करून टीव्ही बंद केला. त्यानंतर आम्हाला त्याची सवय देखील झाली. आता घरात टीव्ही सुरू नसल्याचे आम्हाला काहीच वाटत नाही. उलट मिळालेल्या रिकाम्या वेळेत घरात संवाद वाढला आहे. नाती अधिक घट्ट करण्यासाठी आता क्वॉलिटी टाईम मिळू लागलाय. टीव्ही हा आमच्या आयुष्यातून आम्ही घालवून दिलाय.
:-Mukund Madhukar Hingne.
Leave a reply to veerites उत्तर रद्द करा.