Behind every glossy strand, there might be a silent scream.
A recent investigation from Tamil Nadu has revealed a chilling fact.
Some hair oil industries are allegedly using rabbit blood as an ingredient.
This is marketed online as premium oil for strong and shiny hair.
The manufacturers claim they “purchase” the blood and do not kill the rabbits.
But repeated bleeding is cruelty, not care.
Consumers remain unaware participants in this harsh reality.
Beauty, when built on pain, loses its grace.
It’s time to ask what goes into our daily-use products.
Ignorance should no longer be our excuse.
What’s shocking?
* Hair oil companies allegedly using rabbit blood.
* Sold online under premium hair care brands.
* Accused claim to “buy blood” without killing animals.
* Raises ethical, legal, and consumer awareness issues.
🔴 A Business Model Built on Silence :-
While companies proudly advertise herbal blends, their sourcing is far from gentle. Rabbits, often used in labs, are now sources of raw material for cosmetics. Whether bled once or multiple times, the impact on their health and wellbeing is immense. The silence of these creatures hides the noise of cruelty.
🔴 Consumer Deception and the Illusion of Luxury :- Premium packaging and online presence create a mirage. Nowhere on the label do they mention animal-based ingredients. This deliberate omission violates both consumer rights and basic ethics. Buyers are unknowingly endorsing a cycle of exploitation.
🔴 Legal Grey Zones and Ethical Darkness :-
India's animal welfare laws are often bypassed. “Not killing” doesn’t mean “not hurting.” The ethical debate is not just about legality — it’s about the intent and impact. Until stricter regulation and honest labeling are enforced, such practices will continue unchecked.

“केसांच्या चमकण्यामागचे मूक रडगाणं : केसांच्या तेलासाठी सशांचं रक्त ?”
चकचकीत केसांच्या आड मूक किंकाळ्या दडलेल्या असतात.
तामिळनाडूतून आलेली बातमी हादरवून टाकणारी आहे.
काही तेल उत्पादक कंपन्या सशांच्या रक्ताचा वापर करत असल्याचं समोर आलंय.
हे केसांना मजबुती देणारे “प्रीमियम” तेल म्हणून विकलं जातंय.
कंपन्यांचा दावा – आम्ही सशांना मारत नाही, रक्त खरेदी करतो.
पण रक्त निघेपर्यंत पकडणं हीही क्रूरता नाही का?
ग्राहक या अमानुष व्यवहाराचे अनाहुत भागीदार ठरतात.
दुःखावर उभं राहिलेलं सौंदर्य खरंच सौंदर्य आहे का?
आपण नेहमीच्या वापरातील गोष्टींमध्ये काय दडलेलं आहे ते तपासायला हवं.
अज्ञान हे आता आपलं कारण ठरू शकत नाही.
काय धक्कादायक आहे?
* सशांच्या रक्ताचा वापर करून केसं वाढविण्याचं तेल तयार.
* हे तेल ऑनलाइन प्रीमियम उत्पाद म्हणून विकलं जातंय.
* उत्पादक म्हणतात, "सशांना मारत नाही, फक्त रक्त घेतो."
* यामुळे नैतिकतेचा, कायदेशीरतेचा आणि ग्राहक जागृतीचा प्रश्न निर्माण.
🔴 शांततेच्या नावाखाली चाललेला उद्योग :-
हर्बल तेल म्हणून जाहिरात केली जात असली, तरी त्यामागचं उत्पादन क्रूरतेचं आहे. पूर्वी प्रयोगशाळांमध्ये वापरले जाणारे ससे, आता सौंदर्यप्रसाधनांच्या कच्च्या मालासाठी वापरले जात आहेत. त्यांच्यावर वारंवार रक्त काढण्याची प्रक्रिया त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम घडवते. त्यांचं मूकपणच माणसाच्या निर्दयीपणाला कवच बनतं.
🔴 लक्झरीचं भासवलेलं स्वप्न आणि ग्राहकांची फसवणूक :-
प्रीमियम पॅकिंग आणि ऑनलाइन ब्रँडिंगमुळे ग्राहक भ्रमात पडतात. लेबलवर कुठेही प्राणीजन्य घटकांचा उल्लेख केला जात नाही. ही माहिती लपवणं ही केवळ फसवणूक नाही, तर नैतिक दुर्लक्ष आहे. ग्राहक नकळत या शोषणाचं समर्थन करत राहतात.
🔴 कायद्याची मर्यादा आणि नैतिकतेचा अभाव :-
भारतात प्राण्यांबाबत असलेले कायदे बरेचदा दुर्लक्षित केले जातात. “मारत नाही” म्हणजे “त्रास देत नाही” असं होत नाही. हा वाद केवळ कायद्याचा नाही, तर माणुसकीचा आहे. जबाबदारीचं उत्पादन, पारदर्शक माहिती आणि कठोर नियंत्रण याशिवाय ही क्रूरता थांबणार नाही.

:-Mukund Madhukar Hingne.
यावर आपले मत नोंदवा