“There is no place in the world that I consider off-limits.”

What place in the world do you never want to visit? Why?

From my perspective, there is no place in the world where I would ever refuse to go. Every place has its own unique identity—some are blessed with breathtaking natural beauty, others echo with traces of history, and some thrive with vibrant and distinct cultures. Experiencing and understanding all of this is what gives life a deeper meaning. After all, travelling the world is not just about wandering—it’s about discovering.

For me, travel is not just about sightseeing, but about enriching the inner world. As long as I have access to Indian food and a way to communicate, I’m ready to go anywhere — even to the farthest corner of the world.

🔸 Indian Food is a Must

I would love to travel anywhere in the world, but I need two things with me —
First, Indian food, because it is my emotional and cultural strength. Many people feel uneasy due to unfamiliar food when they go abroad, but if Indian food is available, both the body and mind remain content.


🔸 A Good Interpreter is Essential

The second thing is a good interpreter. Without the barrier of language, conversations become deeper and more meaningful. I want to talk to the local people, learn about their culture, and see the world through their eyes — and for that, an interpreter is an essential bridge.


🔸 Every Country Has Its Uniqueness

Every country, every culture has something special about it. Sometimes it’s seen in their festivals, and sometimes even in their simple way of life. At times, a historical site touches the heart, and sometimes the simplicity of the local people leaves a lasting impression.


🔸 If You Want to Broaden Your Understanding…

If you want to expand your understanding of the world, you have to erase the boundaries — and for that, I would never hesitate to travel to any geographical location.


“माझ्यासाठी जगातील असे कोणतेच ठिकाण वर्ज्य नाही…!”

माझ्या दृष्टीने जगात असं कोणतंच ठिकाण नाही जिथे मी जायला कधीही नकार देईन. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक खास ओळख असते-कुठे निसर्गाचं अद्वितीय रूप असतं, कुठे इतिहासाचे ठसे, तर कुठे वेगळीच लोकसंस्कृती. या सगळ्यांचा अनुभव घेणं, समजून घेणं, हेच तर जीवनाला एक वेगळा अर्थ देतं. बाकी जगभ्रमंती म्हणजे नुसतं भटकणं नव्हे.

माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ स्थळदर्शन नव्हे, तर मनोविश्वाची समृद्धी. फक्त भारतीय पध्द्तीचे अन्न आणि संवादाची सोय झाली, की मी कुठेही जायला तयार आहे — अगदी जगाच्या टोकालाही.

🔸 सोबत भारतीय जेवण हवे

मला जगात कुठेही जायला आवडेल, फक्त दोन गोष्टी सोबत हव्यात —
एक म्हणजे भारतीय जेवण, कारण तेच माझं भावनिक आणि सांस्कृतिक बळ आहे. परदेशात गेल्यावर अनेकजण अन्नामुळे अस्वस्थ होतात, पण जर भारतीय अन्नाची सोय असेल, तर शरीर आणि मन दोन्ही आनंदी राहतं.


🔸एक चांगला दुभाषी हवा

दुसरी गोष्ट म्हणजे एक चांगला दुभाषी. भाषेचा अडथळा नसता, तर संवाद अधिक सखोल आणि प्रभावी होतो. मला तिथल्या लोकांशी बोलायचं आहे, त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांच्या नजरेतून जग पाहायचं आहे — आणि त्यासाठी दुभाषी एक सेतू म्हणून अत्यंत आवश्यक आहे.


🔸प्रत्येक देशाची खासियत असते

प्रत्येक देशाची, प्रत्येक संस्कृतीची एक खास गोष्ट असते. कधी ती त्यांच्या सण-उत्सवांमध्ये दिसते, तर कधी त्यांच्या साध्या जीवनशैलीतही एक वेगळेपण जाणवतं. कधी तेथील एखादं ऐतिहासिक स्थळ मनाला स्पर्शून जातं, तर कधी स्थानिक लोकांचा साधेपणा प्रभावित करतो.


🔸समज वाढवायची असेल तर…

जगाची समज वाढवायची असेल, तर सीमारेषा पुसून टाकाव्या लागतात — आणि त्यासाठी मला कुठल्याही भौगोलिक ठिकाणी जायला कधीच संकोच वाटणार नाही.


:-Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)