कॅटेगरी: Articals

  • एक मोदी विरुद्ध छत्तीस प्रतिमोदी

    भारतीय चॅनल्सवर फॉग परफ्यूम आणि बॉडिस्प्रे उत्पादनांची एक लोकप्रिय ठरलेली जाहिरात सतत दाखविण्यात येते. या जाहिरातीत एक बुचकळ्यात पडलेला व्यक्ती वेगवेगळ्या दुकानदारांना विचारतो…’क्या चल रहा है ?’ त्यावर तो दुकानदार म्हणतो…’फॉग चल रहा है’ त्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या पद्धतीने हाच प्रश्न विचारला तरी उत्तर एकच येते….’फॉग चल रहा है’. सध्या भारतीय राजकारणात देखील असंच सुरू आहे.…

  • कारवाईचे राजकारण की राजकारणाची कारवाई…?

    काल म्हणजे दि. ६ मार्च रोजी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बडे नेते (प्रवक्ते) संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्तेवर जप्तीची कारवाई करीत ईडीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘धुरळा’ उडवून दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नबाब मलिक हे देखील ईडीच्या…

  • लाकडी घाण्यावरील खाद्यतेलाचा ट्रेण्ड वाढतोय..!

    रिफाईंड डबल फिल्टर म्हणून यांत्रिक आणि रासायनिक प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलाचा स्वयंपाकात वापर करण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने घाण्यामधून काढलेले खाद्यतेल रोगप्रतिकारक असते. त्यातही लाकडी घाण्याला प्राधान्य देणाऱ्या अलीकडे सुचविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सल्ल्यामुळे शहरी भागातून पुन्हा एकदा लाकडी घाण्यातून चरक पद्धतीने काढलेल्या खाद्यतेलाला महत्व प्राप्त होवू लागले आहे. भारतात वापरासाठी लागणाऱ्या खाद्यतेलापैकी फक्त ३० टक्के उत्पादन भारतात होते.…

  • महाआघाडीची ‘सत्ता’ शिवसेनेला किती लाभदायक ठरेल…?

    मुंबईत शिवसेना आहे म्हणूनच मुंबईत मराठी माणूस आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे. ही वाक्य बालवयापासून मनावर कोरलेली आमची पिढी शिवसेनेवर गल्लीतल्या ‘तरुण मंडळा’पेक्षाही जीवापाड प्रेम करत आली आहे. केंद्रात देखील हिंदुत्ववादी विचारांची सत्ता असावी या हेतूने पंचवीस वर्षांची भाजपा बरोबर युती निभावणारी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्हाला देव-देश आणि धर्माचे रक्षण करणारी सेना वाटली.…

  • द काश्मीर फाईल्स ते आमच्या डोक्यातील फाईल्स

    एखाद्या सिनेमावरून वादंग निर्माण होणे आणि त्यातून समाजातील दोन गटात काहीकाळ तणावाची, शंकेखोर परिस्थिती निर्माण होणे हे भारतासारख्या १३० कोटींची जनसंख्या असलेल्या देशात नवीन नाही. मुळातच माणूस प्रतिक्रियावादी प्राणी आहे. त्यातही दोन वर्ग पडतात. क्रियेबरोबरच प्रतिक्रिया देणारा एक वर्ग आणि क्रियेनंतर खूप काळाने म्हणजे परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा वर्ग. पहिल्या वर्गाची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची…

  • मोदींच्या पक्षाला ‘यश’ नेमके कुणामुळे मिळतेय ?

    नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीला ‘यश’ नेमके कुणामुळे मिळतेय ? हा प्रश्न आता सर्वच विरोधी पक्षांबरोबरच राजकीय आकडेमोड तज्ज्ञांना पडला आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतून घवघवीत यश मिळविलेल्या भाजपाला त्यावेळी मोदी लाटेमुळे सत्ता मिळाली असा निष्कर्ष काढला गेला होता. तर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या ‘यशा’मध्ये…

  • कश्या पुसतील या अस्पृश्यतेच्या वेदनादायी खुणा…?

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीने समाजसुधारक आणि सुधारणावादी पुढाऱ्यांना भारतीय समाजांतर्गत जातीयवाद, अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा समान हक्क या तीन आघाड्यांवर लढा द्यावा लागत होता. भारतीय समाजांतर्गतच जातीभेद आणि स्पृश्य-अस्पृश्यतेची भिंत असल्याचे पाहूनच वर्णद्वेषी ब्रिटिशांनी त्यांच्याकरिता सुरू केलेल्या हॉटेल्स मधून भारतीय वंशाच्या लोकांना प्रवेशासाठी मज्जाव करणारे बोर्ड हॉटेल बाहेर लावलेले असायचे. त्याचकाळात म्हणजेच १८९६ मध्ये सिनेसृष्टीचे जनक…

  • मोदी यांची व्होटबँक की हिंदुत्वाची व्होटबँक…?

    नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला पंजाब सोडून इतर चार राज्यात म्हणजेच उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या चार राज्यात मिळालेल्या दणदणीत यशाचा अन्वयार्थ लावण्यात आता सर्व राजकीय निरीक्षक, वृत्तपत्रे, माध्यमे मश्गूल झाली आहेत. भारताबरोबरच भारतीय राजकारणाकडे डोळे लावून बसलेल्या इतर देशांमध्येही या निकालाचे पडसाद उमटू…

  • आता राष्ट्र उभारणी, महागाई आणि विस्थापितांचा प्रश्न…!

    कोणत्याही परिस्थितीत युद्ध हा समर्थनीय तोडगा असूच शकत नाही. चर्चेतूनच कोणत्याही समस्येवर सन्मानजनक मार्ग काढला जावू शकतो. आता रशिया-युक्रेन हे युद्ध अंतिम वळणावर येऊन ठेपले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाने युक्रेनतर बेचिराख झालेच आहे. पण जगासमोर आता महागाई आणि युक्रेनमधून विस्थापित होत असलेल्या लाखों लोकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.…

  • शिवप्रेमींच्या निदर्शनाच्या गदारोळात राज्यपालांचा सोलापूर दौरा

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संतप्त शिवप्रेमींचा रोष ओढवून घेतलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शुक्रवार दि. ४ मार्चचा सोलापूर दौरा हा तणाव, बंदोबस्त आणि निदर्शनाच्या गदारोळात झाला. दि. २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक…