कॅटेगरी: Articals
-
आमच्या गल्लीत गव्हर्नर यायले बेss…!
साधुसंत येति घरा,तोचि दिवाळी-दसरा असं पूर्वी म्हंटलं जायचं. आता ‘राजकारणी येता दारा, सुविधांसाठी हातपाय पसरा’ असं म्हणायची पाळी आली आहे. तसं आम्हाला पण राजकारणी लोक कधी आमच्या भागात येतात याची आम्ही वाटच पहात असतो. त्यातही गल्लीत येणार म्हणल्यावर अपेक्षांची भलीमोठी यादीच तयार असते. तेव्हढेच त्यांच्या निमित्ताने का होईना थोड्याफार सुविधांची कामे होतात. ते ज्या मार्गावरून…
-
रशिया-युक्रेन संघर्ष आणि भारत
गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 मुळे संपूर्ण जग त्रस्त झालेले असताना संसर्गाची लाट आटोक्यात आणण्यासाठी जगभर जी मानवतावादाची ‘लाट’ उसळली होती, ती नेमकी कोणत्या उद्देशाने ? हाच खरा प्रश्न आहे. कोविड-19 या व्हायरसला चीनने जन्माला घालून संपूर्ण जगाला संकटात टाकले. या नव्या वादातून संपूर्ण जग (एकटे पाकिस्तान सोडून) चीनच्या विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. अमेरिकेने…
-
हुश्शss… सुरू झाली एकदाची ‘हिरक महोत्सवी’ राज्य नाट्य स्पर्धा…!
असं म्हणतात की, कोणत्याही देशाची, राज्याची, प्रदेशाची, विभागाची, जातीची अथवा धर्माची समृद्धी ही तिथल्या सांस्कृतिक प्रथा आणि परंपरांमध्ये गणली जाते. म्हणूनच जगात भारतीय संस्कृती आणि परंपरेला सर्वोच्च स्थान आहे. याच संस्कृती-परंपरेत ‘नाटक’ हे अभिजात समजले जाते. महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे ते केवळ तिथल्या विकासाच्या घडामोडींमुळे नव्हे तर या राज्याच्या पायाच मुळात भाषा आणि संस्कृतीमूल्यांवर…
-
इंटरनॅशनल ‘वन डे’त कामगिरी बजावलेला पंच वाहनतळ सांभाळतोय…!
क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ असून इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असलेले क्रिकेट भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅन्ड, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंकासह आता आखातातील देशातही खेळला जातो. भारतात क्रिकेटची सुरुवात १७९७ च्या सुमारास झालेले उल्लेख सापडतात. क्रिकेटमध्ये मैदानावर निर्णय देण्यासाठी दोन पंच (अंपायर) ठेवण्याची प्रथा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये १८७७ मध्ये एका कसोटी सामन्यावेळी सुरू झाली. कोसस्टिक आणि…
-
‘वुमन सेफ्टी जॅकेट’चा अविष्कार करणारी सोलापूरची अंकिता रोटे
एकट्या महिलेला गाठून तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या घटना आपल्या ‘अवती-भवती’ नेहमीच घडत असतात. घटना घडून गेल्यानंतर अत्याचाराविरोधात मोर्चा, उपोषण, आंदोलन, कँडल मार्च काढून ‘त्या’ अत्याचारपीडित महिलेला अथवा मुलीला न्यायाची वाट पहावी लागते. आपल्या ‘अवती-भवती’ घडणाऱ्या या घटना ऐकून-बघून शाळकरी वयापासूनच व्यथित होणाऱ्या सोलापूरच्या युवा अभियंता संशोधक अंकिता दादाराव रोटे हिने जवळपास तीन-चार…
-
‘प्रजासत्ताक दिन’ म्हणजे काय असतं रे भाऊ…?
भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या सार्वभौम देशाचा स्वातंत्र्य दिना इतकाच महत्वपूर्ण दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. या स्वतंत्र झालेल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली. अर्थात हे स्वतंत्र झालेले लोकराज्य चालविण्यासाठी स्वतंत्र संविधानाची आवश्यकता होती. याकरिता संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ सदस्यांची मसुदा समिती गठीत…
-
गेल्या दोन वर्षांपासून विदेशाचे आकर्षण कमी होतंय का ?
उच्च शिक्षणासाठी, व्यवसाय किंवा नोकरीसाठी, डॉलरच्या कमाईसाठी विदेशात स्थलांतरित होण्याच्या भारतीयांच्या स्वप्नांना कोविड 19 महामारीमुळे चांगलाच ब्रेक लागला असं म्हणता येईल. संयुक्त अरब अमिराती, दुबई, कुवैत, अमेरिका, लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशातून चांगला पैसा कमावून भारतात परत यायचं. हे स्वप्न पाहणारे आजही अनेक भारतीय तरुण-तरुणी गेल्या दोन वर्षांपासून ‘कधी एकदा सुरळीत होतंय या संधीची वाट…
-
ग्रामीण महाराष्ट्रात “हुरडा पार्टी”ची लगबग सुरू..!
मकरसंक्रांतीनंतर म्हणजेच साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शेतकरी बांधवांच्या “हुरडा पार्टी”च्या आयोजनाची लगबग सुरू होते. ‘हुरडा’ म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातून ग्रामीण भागात आता हुरडा पार्ट्यांना धुमधडाक्यात सुरुवात होते. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा तालुका ज्वारीचे कोठार समजल्या जातो. त्यामुळे सोलापुरी हुरडा पार्ट्यांची रंगतच न्यारी असते.…
-
बचतीच्या संस्काराने महामारीतही भारतीयांचे हाल कमी…!
भारतीयांचे अर्थशास्त्र हेच मुळात बचतीच्या सुत्रांवर उभारलेले आहे. अर्थात बचत हीच भारतीय असण्याची ओळख आहे. तीच भारतीयांची संस्कृती आहे. संस्कृती वरून आठवलं….संस्कृती म्हंटलं की सर्व धर्म त्यात आले. भारतात राहणारे सर्व धर्मीय पहिल्यांदा भारतीय आहेत. नंतर ते त्यांच्या धर्माचे, कुटुंबाचे, समाजाचे आहेत. त्यामुळेच भारतात पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणारे देखील पहिल्यांदा ते भारतीय म्हणून ओळखले जातात. त्यांना…
-
“लॉक डाऊन” हा क्राऊड फोबिया बनतोय काय…?
कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडून सतत पुकारण्यात येणाऱ्या निर्बंधाची आणि लॉक डाऊनची दहशत कायम असून आता या दहशतीची हळूहळू सवय होवू लागली आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात आधीच आत्ममग्न झालेले समाजजीवन मोबाईल पाठोपाठ आता लॉक डाऊनच्या ‘फोबिया’ने ग्रस्त झाले आहे. लॉक डाऊन हा कोविडशी लढण्याचा पर्याय नक्कीच नाही. पण लोकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या आड…