कॅटेगरी: Articals
-
तुज ठायी ज्याची प्रीती । त्याची घडावी संगती ।।
Describe one habit that brings you joy. तुम्हाला आनंद देणारी तुमची एक सवय सांगा ? असा प्रश्न कुणी विचारला तर क्षणभर आपण कावरेबावरे होवून जातो. एकतर मुळात आपल्या वाट्याला जे जगणं आलंय त्याचा आनंद कसा घ्यायचा ? हेच मुळात आपल्याला समजलं नसेल तर मग आपण आपल्या आनंद देणाऱ्या एखाद्या सवयीबद्दल कसे बोलणार ? आपण त्याच्याबद्दल…
-
कार्पोरेट नोकऱ्या म्हणजे आळवा वरचे पाणी….!
शर्यतीच्या घोडेबाजारात अशाच घोड्यावर पैसे लावले जातात जो भलेही शर्यत जिंकला नाही तरी चालेल पण ‘चुरस’ निर्माण करणारा असला पाहिजे. इथे थकलेला, लंगडा आणि वयस्क घोडा चालत नाही. रेसकोर्स वर पैसे उधळणाऱ्या सोकॉल्ड व्हाईट कॉलर उच्चभ्रू धनिकांच्या तोंडी एक वाक्य कायम असते….A horse that cannot run,must be shoot. म्हणजेच पळू न शकणाऱ्या घोड्याला गोळी घातली…
-
आजचा दिवस सामान्य होता का ?
Was today typical? भारतीय लोकांची एक साधारण मानसिकता आहे. सेकंदागणिक त्यांना सतत काहीतरी अतर्क्य, अदभूत, रोमांचकारी किंवा अगदीच भीषण थरार घडवून आणणाऱ्या घटना घडाव्यात असे वाटत असते. दिवस उजाडतानाच सर्व ईप्सित सुखे एखाद्या अज्ञात शक्तीद्वारे आपल्या पायाशी लोळण घ्यावीत मात्र इतरांच्या सुखावर ‘वरवंटा’ फिरवा अशी मनोकामना करीतच दिवस सुरू होत असतो. बहुदा याच मानसिकतेचा अभ्यास…
-
तुमच्या ‘यशा’चे सूत्र तुमचा जनसंपर्क
How would you describe yourself to someone? आजच्या तरुणाई समोर एकच ‘लक्ष्य’ ठेवण्यात आले आहे… ते म्हणजे ‘यश’ मिळविणे. यशस्वी होण्यासाठी जी मुलसूत्रं आचरणात आणावी लागतात त्यासाठी चक्क ‘कोर्सेस’ उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात असे कोर्स केल्याने मूलसूत्रांची ‘ओळख’ करून घेतलेला तरुण आयुष्यात यशस्वी होतोच असे नाही. जगाशी संपर्क साधण्यासाठी पायाभूत शिक्षण हे जरी महत्वाचे…
-
माणूस ‘नास्तिक’ बनवल्या जातो…तो मुळात ‘अस्तिकच’ असतो..!
आज ‘आस्तिक-नास्तिक’चा विषय मांडावा म्हणतोय….माझ्या अल्पबुध्दीला झेपेल अशीच मांडणी असणार आहे. आजकाल आम्हा लेखक मंडळींची चांगलीच ‘गोची’ झालीय. धर्मसंस्काराला फाट्यावर मारताना विज्ञानवादाची ढाल पुढे करत आम्ही पुढारलेल्या (राजकीय विचारधारेला आधीन होत) विचारांचे आणि नवमतवादी म्हणून काहीकाळ मिरवतो. पण अर्ध्याअधिक वाटेपर्यंत गेल्यावर आमच्या लक्षात येते मूळ धर्मसंस्काराची पाळेमुळे आम्ही आमच्याच मनातून उखडून टाकू शकलेलो नाहीत. लौकिक…
-
तब्येत उत्तम राहण्यासाठी तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी उपयोगात आणता…?
What strategies do you use to maintain your health and well-being? आपल्या परिचयाचा व्यक्ती काही दिवसांच्या अंतराने भेटला किंवा एखादा दूरचा नातेवाईक जरी भेटला तर संवादाची सुरुवात ” कसे आहात ?” किंवा “काय म्हणते तब्येत” या सरळ वाटणाऱ्या गर्भित अर्थाच्या प्रश्नानेच होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर कदाचित आपणहून बोलायला सुरुवात करण्यासाठी मनात विषयाची जुळवाजुळव करायला काही…
-
पावसाळ्यात अंगावर पाणी उडविण्याची देशी मॅरेथॉन
पावसाळा कुणाला आवडत नाही ? पहिला पाऊस अंगावर घ्यायला, उघडीप न देता संततधार पडणाऱ्या पावसात ऑफिसला दांडी मारून ‘एक उनाड दिवस’ साजरा करायला कुणाला बरं आवडणार नाही ? आजूबाजूच्या धुळीने मातकट झालेल्या इमारती पावसाने धुवून स्वच्छ झालेल्या नजरेत साठवून घेत रस्त्याच्या कडेला चहाच्या टपरीवर कोंडाळ्यात अर्धेअधिक अंग भिजवत ‘कट’वाला चाय पिण्याची मजा कुणाला नको असते…
-
….. तरच तुम्ही उपाशी राहणार नाहीत..!
What foods would you like to make? आज नेहमीच्याच म्हणजे बेरोजगारी, महागाई, विषमता, आर्थिक शोषण, महिनाभर काम केल्यावरही मिळणारे तुटपुंजे वेतन, वाढत्या कुटुंबाच्या गरजा पुरवताना होणारी त्रेधातिरपीट या असल्या डोक्याला मुंग्या आणणाऱ्या विषयावर आपण लिहायचंच नाही असं ठरवूनच बसलोय. आज कुछ हटके हो जाये… म्हणून बहुसंख्य भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन पुरुषांचा नावडता असलेला विषय म्हणजे ‘तुम्हाला…
-
टोमॅटोचा बाजारखेळ अन सोशल मिडियावरची शेती
तिसऱ्यांदा चांद्रमोहिम राबविणारा भारत देश हा नावापुरताच ‘कृषिप्रधान’ देश राहिला आहे. कारण तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या पाठीमागे वेगाने पळणाऱ्या भारतातील शेतीचे क्षेत्र तितक्याच वेगाने कमी होत चालले आहे. त्यातही ‘शेती’ ही इतकी बेभरवशाची झाली आहे की शेतकऱ्यांनी शेतातून नक्की कोणते पीक घ्यावे हे नव्याने शिकण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच टोमॅटोचा भाव कोसळला म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो…
-
खुपते तिथे दुखते….!
What bothers you and why? कालपरवाच चांद्रयानाचे यशस्वी उड्डाण करून भारत देश बोटावर मोजण्या इतक्या बलाढ्य देशांच्या पंक्तीत जावून बसला आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात ही एव्हढीच एकमेव उपलब्धी नाही. या सातही दशकांच्या प्रवासात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना वेळोवेळी समर्थपणे तोंड देत कासवगतीने का होईना पण प्रगतीचा प्रवास सुरु आहे. ही झाली देश नावाच्या…