कॅटेगरी: Articals
-
जन्मस्थळाचे महात्म्य मोठे की समाधीस्थळाचे….?
अगदी हे आर्टिकल लिहायला बसलो तेंव्हा माझ्या मनात चमकून गेलेला हा प्रश्न आहे. कोणत्याही धर्माचे, पंथाचे, विचारांचे संत-महात्मे किंवा राष्ट्रपुरुष असू द्यात. त्यांचा अनुनय करताना आपल्याला त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवतार समाप्ती पर्यंत त्यांचा जीवनपट आपल्यासाठी प्रेरणादायी असतो. मग या अवतारी पुरुषांच्या जन्मस्थळापेक्षा त्यांच्या समाधीस्थळाचे महात्म्य मोठे का असते ? अतिशय जिज्ञासेपोटीच मी ही शंका…
-
देशाला लागणाऱ्या साखर उत्पादनापैकी सातवा हिस्सा सोलापूरचा
कायम अवर्षणप्रवण राहिलेला सोलापूर जिल्हा १९६० नंतर मात्र पारंपारिक शेती न करता नगदी पिकाकडे वळला. त्यातूनच साखर कारखानदारी उभी राहिल्यावर कारखान्याच्या पाठबळावर परिसरातील शेतकरी ऊस लागवड करू लागला. ६० च्या दशकात जिल्ह्यात दोन-तीन साखर कारखान्याच्या उभारणीने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. आज साठ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील सहकारी कारखाने आणि खासगी कारखान्यांची संख्या चाळीशी पार गेली आहे.…
-
हॉटेल्सच्या संख्येत होणारी वाढ व्यवसायाला कितपत फायदेशीर…?
अठराव्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती मधून क्लबच्या माध्यमातून सुरू केलेली हॉटेल्स हीच भारतीय हॉटेल इंडस्ट्रीची सुरुवात समजली जाते. त्या अगोदर भारतात मंदिर, मठ, धर्मशाळा, राजा अथवा अमीर-उमराव यांच्या मदतीने चालविली जाणारी अन्नछत्र ही पर्यटक, प्रवासी, अनाहूत, अशांची दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था लावत होती. भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असे मानल्या जात असल्याने अन्नदान हा एक संस्कार…
-
नकली दागिन्यांनी प्रत्यक्ष देवाची बोळवण……!
विठुराया भक्तीचा भुकेला अठ्ठावीस युगांपासून आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कर कटीवर ठेवून विटेवर उभारलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला देखील नवस पूर्ण करण्यासाठी बनावट दागिने अर्पण करणारे भक्त भेटतात. भक्तांच्या फक्त भक्तीचा भुकेला असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचे हे शल्य प्रत्यक्ष पांडुरंगच समजू जाणे….’ एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै किसी की भी नही सूनता ‘ हा आदर्श बाळगणाऱ्या…
-
नरेंद्र मोदींना धूर्त म्हणायचं की दृढनिश्चयी समजायचं…?
थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांचे देशाप्रती व्यक्त झालेल्या अनेक सुंदर सुभाषितांपैकी एक कोट अलीकडे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असते. “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो अन या देशाचे आपण देणे लागतो” स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हिंदुत्वविरोधी विचारधारा अंगिकारणाऱ्या अनुयायांमध्ये अनेक प्रवाद आहेत. अगदी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शिंतोडे उडविण्यापर्यंत या वाचाळवीरांची मजल जात असते. अलीकडे भारतीय…
-
दिव्यमराठीचे फूड फेस्टिव्हल अन सोलापुरी खवय्येगिरी
प्रत्येक शहराची-गावाची ओळख ही तिथल्या ऐतिहासिक-सांस्कृतिक परंपरा बरोबरच तिथल्या खाद्य संस्कृतीमुळे लक्षात राहणारी असते. एखाद्या गावाला किंवा शहराला यापैकी कुठलाच वारसा नाही असे गाव किंवा शहर या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. भाषा-धर्म-प्रांत हे भलेही माणसा-माणसांमध्ये दुफळीचे निमित्त ठरत असतील. मात्र तिथली खाद्य संस्कृती ही माणसा-माणसांमध्ये एकोपा निर्माण करणारी असते. बहुविध भाषा आणि एकापेक्षा जास्त धर्म…
-
ब्लॉगचा पहिला वाढदिवस अन नववर्षाची उत्सुकता…!
तसा मी सोशल मीडियावर रुळलोय असं म्हणण्या इतपत दुड्डाचार्य नक्कीच झालेलो नाही. अँड्रॉईड मोबाईल घ्यायलाच मुळात खूप उशीर झाला होता. त्यामुळं सोशल मीडियाची चटक लागायला तसा बराच उशीर झालेला. त्यात पुन्हा पन्नाशी पार केल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सोशल मीडियावर स्वार व्हायचं म्हणजे एक दिव्यच. ऑफिसमधील टेलिफोन किंवा फारच गरज पडली तर क्वॉईन बॉक्सवर आपले…
-
१७० वर्षे जुन्या सोलापूर म्युनिसिपल कार्पोरेशनचा इतिहास !
शहरातील उत्पादित मालावर कर आकारणी करून जमा झालेल्या पैशातून शहर सुधारणेच्या निरनिराळ्या योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या (कलेक्टर) अधिपत्याखाली राबविताना ब्रिटिश सरकारला एका स्वतंत्र स्वायत्त संस्थेची आवश्यकता लक्षात आली. कारण कलेक्टरच्या वेळोवेळी बदल्या केल्या जात असल्याने मागाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्या योजनांचा पाठपुरावा होत नसल्याने योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यास विलंब आणि मूळ योजनेच्या खर्चात वाढ होत असल्याची बाब ब्रिटिश…
-
नव्या वर्षाची सेल्फ प्रॉमिसची टूथ पेस्ट…!
तसं पहायला गेलं तर बारा महिन्यांचा काळ लोटला की नवे वर्ष सुरू होते. कालमापनाची ही सनावळी शतकानुशतके सुरू आहे. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षे सरत असतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आख्खी रात्र जागवली (नाचवली) जाते. सरणाऱ्या वर्षाचा ३१ डिसेंबर हा दिवस (अख्खी रात्र म्हणा हवं तर) तेव्हढ्या साठीच योजिलेला…
-
आम्ही नाथांच्या पालखीचे भोई…..दार उघड बया….
समाज जीवनामध्ये सामाजिक संतुलन रहावे, समाज सर्व विकारमुक्त व्हावा, भोळ्याभाबड्या माणसाला राज्यकर्त्यांचे संरक्षण मिळावे यासाठी दैवी शक्तीचे प्रकटीकरण होणे ही केवळ मध्ययुगीन कालखंडातीलच गरज नव्हती तर आजचीही गरज आहे. तेज, बल आणि बुद्धीचा समन्वय साधणाऱ्या विकारमुक्त निर्भय समाजाच्या निर्मितीसाठी आदिशक्ती दुर्गा देवीला आवाहन करताना संत एकनाथ महाराज म्हणाले होते….. अलक्षपुर भवानी दार उघड, कोल्हापूर लक्ष्मी…