

जानेवारी २०२२ पासून कार्यान्वित केलेल्या माझ्या https://avatibhavati.in या मराठी ब्लॉगने दहा हजार दर्शकांचा टप्पा पार केला आहे. ब्लॉगच्या दुनियेत मराठी ब्लॉग चालविणे तसे दिव्यच आहे. एकतर जगातील बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या मुख्य प्रवाहात कमी बोलली जाणारी मराठी भाषा (संख्यात्मक दृष्टीने) असल्याने ब्लॉगला मऱ्हाठी प्रांताबाहेर कितीसा प्रतिसाद मिळणार ? हा प्रश्न आहेच. पण आपल्या सारख्या वाचकप्रेमींनी या ब्लॉगवर फेरफटका मारायला सुरुवात केली अन माझा उत्साह दुणावला. आता सबस्क्राईबर वाढीचा ‘टास्क’ पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ब्लॉगवर सर्फिंग करणाऱ्या वाचकांना आवाहन…https://avatibhavati.in ला सबस्क्राईब करा 🙏🙏🙏🙏

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा