यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या १० गोष्टी

List 10 things you know to be absolutely certain.

तुम्ही काम कुठलेही करत असाल त्यात यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी अंगिकाराव्याच लागतात. माणूस परिपूर्ण नसतोच. जसं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं अगदी तसंच त्याची जीवनशैली आणि त्याचे बुद्धिकौशल्य, शारीरिक क्षमता देखील वेगळी असते. प्रत्येकात समान वैशिष्ट्ये असू शकतात पण समान गुण असतीलच असे नाही. त्यामुळेच तो जे काम करत असेल त्यात यशस्वी होण्यासाठी त्याला वेगळी अशी क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावीच लागते. मग तुम्ही कुणीही असलात आणि कोणत्याही प्रकारचे काम करत असलात तरी देखील त्या कामात निपुण आणि यशस्वी होण्यासाठी काही महत्वाची गुण वैशिष्ट्ये प्रयत्नपूर्वक आत्मसात करावीच लागतात. मग हमखास यशाला गवसणी घालता येते.

आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पुस्तकी ज्ञान मिळवताना जसे चांगल्या शिक्षकाची गरज असते. अगदी तसेच व्यावहारिक जगात यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. माझ्यादृष्टीने तर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याइतका चांगला मार्गदर्शक जगात शोधूनही सापडणार नाही. तुमच्या यशस्वितेच्या प्रवासात क्षणोक्षणी, पावला-पावलावर तुमचा मार्गदर्शक शरीराने तुमच्या सोबतच असला पाहिजे याची अजिबात आवश्यकता नसते. मार्गदर्शकाचे आदर्श विचार, आपल्या पाठीशी असल्याची जाणीव देखील पुरेशी असते. शेवटी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण कुणाला तरी फॉलो करतच असतो. प्रत्येकाचे मार्गदर्शक वेगळे असू शकतात. इथे गुरू अथवा मार्गदर्शकांची तुलना अपेक्षित नाही. पण जगाने ज्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला असा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतला, अष्टावधान राखलेला महापराक्रमी युगपुरुष आपल्या समोर असताना आणखी कुठल्या मार्गदर्शकाची आपल्याला गरजच काय ? ज्याचे नुसते नामस्मरण जरी केले तरी शरीरभर चैतन्य सळसळते. आकाशाला गवसणी घालण्यासाठी हत्तीचे बळ संचारते. समोर कितीही अवघड पेच असो, राजांचे प्रसंगावधान, कल्पकता, दूरदृष्टी आणि गनिमी कावा आपल्यामध्ये उतरला तर यश आपल्यापासून कितीसे दूर राहणार ?

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त गनिमी कावा एव्हढंच आपल्याला माहीत आहे. पण महाराजांच्या अंगी असणाऱ्या गुण वैशिष्टांपैकी हे दहा गुण वैशिष्ट्ये जरी अंगी बाळगली तर यश नक्कीच आपल्या पायावर लोळण घेईल.

  • दूरदृष्टी (Foresight).
  • व्यवस्थापन (Management)
  • योग्य सहकाऱ्यांची निवड (choosing the right colleagues)
  • सांघिक कार्य (Team work)
  • नेतृत्व (Leadership)
  • वेळेचे नियोजन (Time management)
  • आत्मविश्वास (Confidence)
  • दीर्घकालीन विचार (Long term thinking)
  • शांततेने निर्णय (Deside Peacefully)
  • छोटी सुरुवात (Small Beginning) हीच ती दहा गुण वैशिष्ट्ये आहेत. जी आपण अंगी बाळगली तर यश नक्कीच आपल्या पायाशी लोळण घेईल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. Randhir Abhyankar

    👌👌👌👌💐💐💐💐

    Like

  2. Avinash Hingne

    खूपच छान

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद अविनाश सर 🙏🏼🙏🏼

      Like