ओ माय फ्रेंड गणेशा, तू रहना साथ हमेशा ।।

The manifestation of jealousy, hatred, envy always begins with friendship made with expectation. An example of pure friendship in absolute spirit in the constant competition for something is as far-fetched as finding a ‘diamond’ in a coal mine. According to the average measurement of human life span, the period of wakefulness is taken to be forty years because he spends the same amount of time sleeping. So that leaves only a handful of years for friendship, excluding family responsibilities and job tenure. So should the gathering of a few years be called ‘friendship’ or just ‘acquaintance’ ? At best we can name it as ‘recognition of friendship’. Because recognition is done with expectation.

असूया, द्वेष, मत्सर याच्या प्रकटिकरणाची सुरुवात ही नेहमीच अपेक्षा ठेवून केलेल्या मैत्रीतून होत असते. सतत काही ना काही मिळवायच्या स्पर्धेत निरपेक्ष भावनेने केलेल्या निखळ मैत्रीचे उदाहरण म्हणजे कोळशाच्या खाणीतून ‘हिरा’ शोधण्याइतकेच दुरापास्त आहे. माणसाच्या आयुष्य कालावधीच्या सरासरी मोजमापानुसार जागेपणाचा कालावधी हा चाळीस वर्षांचा धरला. कारण तो तेव्हढाच कालावधी झोपण्यात घालवतो. तर त्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरीचा कालावधी वगळता मैत्रीसाठी निव्वळ बोटावर मोजण्या इतकी वर्षे शिल्लक राहतात. मग काही वर्षांच्या एकत्र येण्याला ‘मैत्री’ म्हणायचं की फक्त ‘ओळख’ ? फारतर आपण त्याला ‘मित्रत्वाची ओळख’ असं नाव देवू शकतो. कारण ओळख ही अपेक्षा ठेवूनच केलेली असते.

‘मैत्री’हा शब्दच मुळात मनामध्ये अनिवार ओढ निर्माण करणारा अन दोन मनांशी जवळीकता साधणारा नुसताच ‘जिवलग’ शब्द नसून ते एक रक्ताच्या नात्यापलीकडचे जीव जोडणारे नाते आहे. मनाशी मनाचे जोडलेले ऋणानुबंधाचे अमूल्य आणि पवित्र असे नाते आहे. असे हे पवित्र नाते-मैत्र जपण्यासाठी जीवाची बाजी लावणारे, प्राणांची आहुती देणारे मित्र देखील इतिहासाच्या पाना-पानातून दिसतात. पण ही झाली एक बाजू. निर्मळ, निरपेक्ष मैत्री हिआता केवळ पुस्तकातील उताऱ्यांमध्येच बंदिस्त होवून अडगळीला पडली आहे. सध्या केवळ मतलब (स्वार्थ) साध्य होत असेल तरच मैत्री टिकते. मुळात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच मैत्रीचा हात पुढे केला जातो. एकदा का स्वार्थ साधल्या गेला की मग ती मैत्री राहत नाही. मग केवळ ओळख उरते. मग स्वार्थाच्या रिकाम्या झालेल्या जागेत असूया, द्वेष, मत्सर येतात. आपल्या मोबाईलच्या फोनबुकमध्ये निवांत पसरलेल्या मित्र कंपनीच्या यादीतील किती मित्रांची नावे आपल्याला तोंडपाठ असू शकतात..? त्या पाठ नावांपैकी कितीजण आपल्याशी नियमित संपर्कात असतात..? कितीजण अडचणीच्यावेळी आपल्या मदतीला धावून आलेले असतात ? मदत करण्याचं सोडून हेच मित्र म्हणवणारे वेळप्रसंगी आपल्यालाच दगाफटका करून पुढे निघून जात असतात. मित्र हा संकटाच्यावेळी अगदी देवासारखा धावून आला पाहिजे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार आरंभाचा देव हा श्रीगणेश आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही श्रीगणेशाच्या पूजनाने केली जाते. म्हणूनच त्याला आरंभीचा देव म्हटल्या जाते. हिंदू धर्मातील देवी-देवतांपैकी श्री गणेश हे एकमेव असे दैवत आहे की ज्याच्याशी आपण थेट मैत्री करू शकतो. ‘सर्व कार्येशु सर्वदा’ असे हे श्रीगणेश दैवत उपकारक, प्रगतिकारक, यशकारक तर आहेच पण हे दैवत मैत्रीचे देखील कारक आहे. मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्रीगणेशाचे आगमन होत आहे. संपूर्ण भारतभरच नाही तर जगभरात गणेश उत्सव मोठ्या भक्तिमय आणि जल्लोषाने परिपूर्ण असलेल्या वातावरणात गणेश आगमन होत आहे. सवाद्य मिरवत सार्वजनिक उत्सव मंडळात तसेच घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते. आबालवृध्दांचा मित्र असलेल्या वरद विनायकाचा उत्सव हा मैत्रीचा जल्लोष असतो. मैत्रीचं गाऱ्हाणं ऐकून घेण्यासाठी आणि त्यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी श्री गणेश येत आहेत…..? माणसांच्या मैत्रीमध्ये जरी तुम्हाला दगा-फटका होत असला तरी श्री गणेशाची भक्ती करा… हाकेसरशी धावून येणारा तो सिद्धिविनायक, संकटमोचक श्री गणेशाचा उत्सव म्हणजे ‘मैत्रीचा उत्सव आहे. दहा दिवसंकरिता या सर्वात जिवलग असलेल्या मित्राच्या आगमनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून गल्ली ते दिल्ली असो किंवा व्हाईट हाऊस असो किंवा गरिबांची साधी झोपडी असो समानतेची शिकवण देणाऱ्या धुम्रवर्णी गजपतीचा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून विदेशातही होतोय. विशेषतः युरोपीय देशात तर अगदी भारताप्रमाणे उत्सव साजरे केले जातात. श्रीगणेशाला यंदाच्या वर्षी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे साकडे घातले असून मनोभावे साद घातली तर श्रीगणेशा प्रतिसाद देतात. गणपतीबाप्पा मोरया.…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to jnzende उत्तर रद्द करा.

Comments (

2

)

  1. jnzende

    गणपती बाप्पा मोरया

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      मोरया 🙏🏻🙏🏻

      Liked by 1 person