जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं…!

What details of your life could you pay more attention to?

My mother always told me, try to find peace within yourself and know that everything in life has a purpose. Nothing happens in your life without purpose. Nothing is wrong. At one time, our approach to it may be wrong. Pure coincidence never happens. What fate has written in our fate happens and happens. Then, due to the event’s that happens in our life, our outlook on life may be different. But it is the sponsorship of lord to make our life more beautiful and exciting.

माझी आई मला नेहमी सांगायची, स्वतःमधील शांततेला शोधायचा प्रयत्न कर आणि जाणून घे की, जीवनात प्रत्येक गोष्टीचा उद्देश असतो. उद्देशाशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत नसते. कोणतीच गोष्ट चुकीची नसते. एकवेळ आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो, निव्वळ योगायोग कधीच घडत नसतो. नियतीने आपल्या भाग्यात जे आणि जसं लिहून ठेवलंय ते तसंच घडत असतं. तेंव्हा तुझ्या-माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे भलेही आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. पण परमेश्वराने आपले आयुष्य अधिक सुंदर आणि रोमांचकारी करण्यासाठी केलेले ते प्रयोजन आहे.

दिसामाजी घडणाऱ्या कल्पित-अकल्पित घटनांचा प्रवास म्हणजे आयुष्य असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही घटना अशा असतात की, त्या आपल्या सोबत घडू शकतात याची पूर्वसूचना किंवा पूर्वसंकेत आपल्याला मिळतात. असे असले तरी त्या घटनांवर आपले नियंत्रण कधीच नसते. तर ज्या घटनांचा आपण कधी विचार देखील मनात आणू शकत नाही अशा अकल्पित घटना आपल्यासोबत घडतात. अशा दोन्ही प्रकारच्या घटना आपल्या सोबतच का घडतात ? याचा आपण विचार करायला लागलो की मग हे सगळं घडवणारी तिसरी शक्ती अदृश्य स्वरूपात कार्यरत आहे या विचारापर्यंत येवून आपण थांबतो. मग त्याला आपण ‘चेतना’, ‘दैव’, ‘भाग्य’, ‘नशीब’ ‘सकारात्मक शक्ती’, ‘चुंबकीय शक्ती’ अशा अनेक नावांनी संबोधतो. कल्पित किंवा अकल्पित पण आपल्याला ‘लाभ’ मिळवून देणारी घटना असेल तर आपण आपल्या बुद्धिमत्तेचे आणि क्षमतेचे कौतुक करत स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. पण आपल्याला हानी पोहोचविणारी घटना असेल तर मात्र आपण दैवाला दोष द्यायला लागतो. वास्तविक आयुष्य हा जर घटनांचा प्रवास असेल तर आयुष्यात खाच-खळगे हे येणारच. पण प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थिती असताना आपले विचार, आपले वागणे आणि आपली कृती किती सकारात्मक आहे त्यावरच आपले ‘नशीब’ अवलंबून असते, हे ज्याला समजते तो आयुष्य खऱ्या अर्थाने जगला असे म्हणता येईल.

काही माणसं ही पसरट स्वभावाची असतात. अघळ-पघळ बोलणारी ही माणसे मुळातच गप्पीष्ट असतात. विषय कुठलाही असो, त्याबद्दल पुरेशी माहिती जरी नसली तरी अशा विषयांवर आपली मते मांडण्यासाठी ही माणसे अग्रेसर असतात. अर्धवट माहिती किंवा इतरांच्या बोलण्यातून माहिती झालेला विषय मांडताना ही माणसे त्यात स्वतःची मते अगदी तिखट-मीठ लावून सांगण्यात पटाईत असतात. असं केल्याने आपल्याला ‘वैचारिकतेचा’ दर्जा मिळतो असा काहीसा ‘भ्रम’ या लोकांचा झालेला असतो. बऱ्याच वेळा अशा लोकांना समाजात स्थान देखील मिळते. पण ते अस्थायी स्वरूपाचे असते. शेवटी तो भ्रमच असतो. कधी ना कधी तो उजेडात येणारच असतो. पण औट घटकेचे का होईना ‘मोठेपण’ मिळते म्हणून अशी माणसे आपला ‘तोंडाळ’पणा सुरूच ठेवत असतात. पुढे काय होणार आहे ? याचा अंदाज न घेताच यांचा बाष्कळ बडबडीचा उद्योग सुरूच असतो. बरं गप्पीष्टपणा अंगात मुरलेला असल्याने इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याकडे यांचा कल नसतो. त्यामुळे इतरांचे ऐकून घेण्याची क्षमता कमी असते. किंबहुना ती मृत झालेली असते. त्यामुळे असे वाचाळवीर खूप मोठ्या संकटांचे धनी होत असतात. एकवेळ तुमच्या वागणुकीमधील तोल सांभाळता आला नाही तरी चालेल पण तोंड सांभाळता आले पाहिजे अन्यथा तुम्ही संकटाला आमंत्रण दिले म्हणून समजा. आपल्याला हे सगळं समजत असतं. पण ‘कळतं पण वळत नाही’ अशीच आपली अवस्था असते. आयुष्यात एकदा का होईना अशा वाचाळवीरांच्या संगतीमुळे प्रत्येकाला कधी ना कधी फटका हा बसलेला असतोच. कारण ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नसते. म्हणूनच आपण म्हणतो की, जे घडायचं ते घडणारच आहे आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. आपल्या वाचाळतेने आपलेच स्थान डळमळीत करणारे ‘शेखचिल्ली’ आपल्याला पावलो-पावली भेटतात. आता हे आपल्यावरच आहे की त्यांच्याशी घनिष्टता ठेवायची की सुरक्षित अंतर….माझा तर व्यक्तिगत अनुभव हेच सांगतो….दूर रहा अशा आत्मघाती मूर्खांपासून….!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. jnzende

    आत्मघाती शेखचिल्लींचे चित्र खूप सूचक आहे.

    Liked by 1 person

  2. Nagesh Dharne

    वास्तव मांडले आहे

    Liked by 2 people