पुन्हा पुन्हा जेरुसलेम…!

There is also a reason for saying Jerusalem again and again. The world is once again remembering Jerusalem due to the genocide between Israel and Hamas since October 7. Jerusalem is the most famous city in the world. But there is still some glory in Jerusalem. That is why Jerusalem is described as a golden cup full of scorpions. The conflict between the Israel and the Palestinians is not of today’s . This is a conflict that will continue until the end of Judaism and Islam. So the real battlefield is not the Gaza Strip but the real battlefield is Jerusalem. Jerusalem is like a witch. She even has a brief romance with a Prince who has a crush on her but kills him when she gets bored. However, Jerusalem, the ‘holy place’ of the world’s three major religions, is never desecrated. As the chanted holy water should be sprinkled, once the blood rots, it becomes holy again.

पुन्हा पुन्हा जेरुसलेम’ असं म्हणण्यामागे देखील कारण आहे. परवा ७ ऑक्टोबर पासून इस्त्रायल आणि हमास मधील सुरू असलेल्या नरसंहारामुळे पुन्हा एकदा जगाला जेरुसलेमची आठवण होत आहे. जेरुसेलम ही जगातील सगळ्यात प्रसिद्ध नगरी आहे. पण तरीही जेरुसलेम मध्ये काही वैगुण्य आहेत. म्हणूनच जेरुसलेम हा विंचवांनी भरलेला सोन्याचा चषक आहे असं वर्णन केले जाते. इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष हा आजचा नाही. ज्यू आणि इस्लाम धर्मियांच्या अंतापर्यंत सुरू राहणारा हा संघर्ष आहे. तर खरी रणभूमी ही गाझा पट्टी नसून खरी रणभूमी ही जेरुसलेम आहे. जेरुसलेम ही एखाद्या विषकन्येसारखी आहे. तिच्यावर फिदा होणाऱ्या राजपुत्रा समवेत ती काहीकाळ प्रणय देखील करते, पण कंटाळा आल्यावर त्याला ठार मारते. असं असलं तरी जगातील तीन प्रमुख धर्मियांचे ‘पवित्रस्थळ’ असलेले जेरुसलेम कधीच विटाळत नाही. मंतरलेले पवित्र जल शिंपडावे तसा रक्ताचा सडा पडला की ते पुन्हा पुन्हा पवित्र होते.

चोहोबाजूंनी कट्टर इस्लामिक राष्ट्रांनी वेढलेल्या इस्रायलचा संघर्ष हा जगाला नवीन नसला तरी संपूर्ण जगालाच विभाजित करणारा हा संघर्ष एकमेकांचा पूर्णतः खातमा करण्याच्याच दिशेने निघाला तर मात्र सरळ-सरळ दोन गटात विभागलेल्या जगाला युद्धात प्रत्यक्ष उडी घवी लागणार असे चित्र सध्यातरी निर्माण करण्यात अमेरिका आणि रशिया या दोन्हीही महासत्ता सरसावल्या आहेत. रशिया आणि युक्रेनचा संघर्ष अजून तरी थंडावलेला नाही. त्या संघर्षातही अमेरिकेने युक्रेनला आतून पाठबळ देत रशियाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. आता इस्त्रायल-हमासच्या संघर्षात इस्रायलच्या बाजूने अमेरिकेने युद्धज्वर वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने आता रशिया देखील गाझा पट्टीत निरपराध पॅलेस्टिनी नागरिकांच्या संहाराचा मुद्दा पुढे करत या संघर्षात उडी घेण्याच्या तयारीत आहे. मुळातच हमास, इसिस, हिजबुल्लाह या प्रकारच्या दहशतवादी संघटना आणि महासत्ता यांच्यामधील अडीच घरांच्या चाली भलेही त्यांच्या फायद्याच्या ठरत असल्या तरी शांतताप्रिय देशांसाठी हे एक नवे आव्हान आहे. आता इस्त्रायल आणि हमास यांच्या संघर्षात ७ ऑक्टोबरपासून हमासने केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या निरपराध नागरिकांचा बळी जात आहे हा मुद्दाच विस्मरणाकडे ढकलण्याचा प्रपोगंडा सुरू करण्यामागे काही देश गुंतले आहेत. विशेषतः युद्धानंतर उडणाऱ्या महागाईच्या भडक्यात कच्च्या तेलाचे भाव भडकतील. आधीच अंतर्गत यादवीने पोखरलेल्या देशांना ही महागाई होरपळून काढणारी ठरणार आहे अशाच देशांची आता ओरड सुरू झाली आहे.

जगातील ५७ मुस्लिम देशांपैकी किती देश इस्रायलच्या विरोधात प्रत्यक्ष युद्धात सहभागी होतील ? या प्रश्नाचे उत्तर आजतरी कुणालाच ठामपणे देता येणार नाही. पॅलेस्टिनी नागरिकांना स्वतंत्र देश हवा ही मागणी एका बाजूला रास्त वाटत असली तरी जेरुसलेमचा समावेश असलेला भूभागाचा स्वतंत्र तुकडा हवा ही मागणी इस्रायलला कदापिही मान्य होणारी नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा जेरुसलेमच्या मुद्द्यावर तीन धर्मांमधील संघर्ष हा जिवंत ठेवला जाईल. आत्ताची इस्त्रायल-हमास ही लढाई म्हणजे या संघर्षाचा शेवट नक्कीच नाही. जरी इस्रायलला हमासचा खातमा करण्यात यश मिळाले तरी काही काळाच्या शांततेनंतर पुन्हा एखाद्या नव्या संघटनेचा उदय होईल. कधीकाळी ज्यू धर्मियांना हुसकावून लावणाऱ्या इस्लामी राज्यकर्त्यांना त्याच भूमीतून ज्यूंनी हुसकावले. हाच त्यांचा इतिहास बनला आहे. त्यामुळेच जेरुसलेम ही अशी प्रेयसी आहे जी कधीच कुणा एकाचं स्वामित्व स्वीकारलेली नाही. तरी देखील तिच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या तीन धर्मियांना ती आपल्याच ताब्यात रहावी याची लालसा आहे. आता इस्रायलला लागून असलेल्या देशांना जेरुसलेम हवे आहे पण पॅलेस्टिनी नको आहेत. जर मृत्यूच्या भीतीने गाझा पट्टी सोडण्याची तयारी पॅलेस्टिनी नागरिकांनी केली तरी त्या घोळक्यातून हमासचे कट्टरपंथी आपल्या देशात घुसतील ही भीती त्यांना आहे. कदाचित हमासचे अतिरेकी इस्रायलशी लढता-लढता माघार घेत जर शेजारच्या सीरिया, लेबनॉन, जॉर्डन आणि इजिप्त या देशांमध्ये हमासने आश्रय घेतला तर या देशांना हमास हा छप्पर फाडून बाहेर पडणारा ऊंट सांभाळणे डोकेदुखीचे ठरणार आहे. मुळातच या देशांची जगात प्रतिमा फार चांगली नसताना दहशतवादाला पोसणारी राष्ट्रे म्हणून जग त्यांच्याकडे पाहतील. त्यामुळेच हमासला छुपा पाठिंबा देत आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याकडे या देशांचा प्राधान्यक्रम राहील. अर्थात आक्रमणवादी विचारांची सत्ता असणाऱ्या या देशांकडून जर काही आगळीक झाली तर मात्र हा संघर्ष संभाव्य महायुद्धाच्या अगदी नजीक पोहोचेल. तिथून माघार घेताना प्रचंड मनुष्यहानी आणि आर्थिक दिवाळखोरी शिवाय कुणाच्याही हाती काहीच लागणार नाही.

आज या विषयावर लिहावं असं मनापासून वाटायला पण एक कारण घडलं. माझे व्यावसायिक मित्र राकेश नारवाणी यांनी सायमन सीबग मोंटफिआरी यांच्या जेरुसलेम एक चरित्रकथा या सविता दामले यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकाची प्रत वाचण्यासाठी दिली. अजून पुस्तक हातातून खाली ठेवलेले नाही. मात्र या पुस्तकाला वाचायला सुरुवात करतानाच एक विषय मात्र मनात डोकावला, आपले भारतातील सध्याचे मोदी सरकार इस्रायलच्या बाजूने उघडपणे का उभे राहिले असेल ? आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा एकच मुद्दा आहे की काश्मीरला जेरुसलेम बनवू पाहणाऱ्या पाकिस्तानला जरब बसावी हा मुद्दा असावा….?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to gosavimanik123 उत्तर रद्द करा.

Comments (

2

)

  1. gosavimanik123

    ✍️✍️👌👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद माणिकजी 🙏🏻🙏🏻

      Liked by 1 person