नावात काय….आमचं जीवनच प्रभू श्रीराम…!

।।जय श्रीराम।।

Many of us do not know much about the meaning of our name, its significance and its origin. Well, because of lack of information, we do not suffer much. Even if someone ask us, we fearlessly tell…. Why our parents gave us this name only they know. Finally if you want to silence the other person, there is a patent sentence…. what’s in a name? Shakspeare said so. But lately we come across people who drive our common sense more than curiosity. But today we can say proudly to the whole world….Whatever our name is. We have ‘Lord Shriram’ in our lives. Ram in the mind, Ram in the body. “Ram” is the identity of us Indians…!

आपल्या पैकी बऱ्याच जणांना आपल्या नावाचा अर्थ, त्याचे महत्व आणि त्याची उत्पत्ती याबद्दल फारशी माहिती नसते. बरं ! माहिती नाहीय म्हणून आपलं फारसं काही बिघडत देखील नसतं. कुणी आपल्याला विचारलं तर बेधडक सांगून टाकतो……काय की आमच्या आई-वडिलांनी हे नाव का ठेवलं त्यांचं त्यांनाच माहीत. पण सगळ्या जगाला आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो…..आमच्या नावाचं काय घेवून बसलात, आमच्या जीवनातच ‘ प्रभू श्रीराम ‘ आहेत. मनात राम, देहात राम…..आम्हा हिंदुस्थानींची ओळखच राम..!

२२ जानेवारी २०२४ हा दिवस आता कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या स्मरणात राहणारा ‘उत्सव दिन’ ठरला आहे. कारण आज आम्हा भारतीयांचा प्राण असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत अयोध्देत नवनिर्मित मंदिरात विधिवत श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जवळपास पाचशे वर्षानंतर आपल्या जन्मभूमीत यानिमित्ताने प्रभू रामचंद्रांचे आगमन झाले आहे अशीच समस्त भारतीयांची श्रद्धा-धारणा आहे. यानिमित्त संपूर्ण देशभर गेल्या चार दिवसांपासून देवांच्या दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. प्रत्येक भारतीय, आपल्या कुटुंबासह, स्नेही-मित्रमंडळींसह, संस्था, मंडळे, संघटना, राजकीय पक्ष-संघटना मिळून हा प्राण प्रतिष्ठापनेचा ‘रामोत्सव’ साजरा करण्यात मश्गुल झाले आहेत. प्रसार माध्यमांनी तर फक्त वार्तांकन नाही तर प्रत्यक्ष उत्सव साजरा करण्यात सहभाग घेतला आहे. भारतातील अग्रणी वृत्तपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै.भास्कर या वृत्तपत्र समूहाच्या मराठी भाषेतून प्रकाशित होणाऱ्या दै. दिव्यमराठी या वृत्तपत्राने तर महाराष्ट्रातील सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या आवृत्ती मुख्यालयाच्या ठिकाणी ‘एक दिवा रामाच्या नावाने’ म्हणून “दीपोत्सवाचे” आयोजन केले. प्रभू रामचंद्र हे करोडो भारतीयांचे ‘प्राण’ आहेत. म्हणूनच २२ जानेवारीच्या दै. दिव्यमराठीच्या वृत्तपत्राचा मथळा अतिशय सूचक असाच आहे.

विधिवत पूजेला जरी पहाटेपासून सुरुवात झाली असली तरी राम आगमनाची दिवाळी ही मध्यरात्रीपासूनच फटाक्यांच्या आतषबाजीत सुरू झालेली होती. जणूकाही प्रभू रामचंद्र आपल्या घरी कोणत्याही क्षणी अवतरतील या श्रध्देने करोडो भारतीयांनी आपली जात-धर्म, भाषा, प्रांत विसरून सारी रात्र जागून काढलीय. कारण राम सर्वांचाच आहे. राम आहे तर श्वास आहे, प्राण आहे आणि आम्ही भारतीय आहोत. हा फक्त अयोध्देचा उत्सव नाही. राम म्हणजे एकट्या शरयू नदीचा खळाळता प्रवाह नाही तर हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत राम आगमनाची युगानुयुगे वाट पहात आपले अस्तित्व टिकवून धरणाऱ्या असंख्य नद्या, उपनद्या, ओढे,जलाशय आणि महासागरांच्या उसळणाऱ्या लाटांचा देखील राम आहे. हीच आम्हा भारतीयांची धारणा आहे हीच आमची ओळख आहे.

गेल्या पाच शतकांहून अधिक काळ प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेली अयोध्या रामजन्मभूमी मुक्तीसाठी धगधगत होती. अखेर पाच शतकांचा हा दोन धर्मियांचा वाद अतिशय अभ्यासपूर्ण सलोख्याने भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च न्यायालयात सुटला आणि खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला. म्हणूनच अयोध्या नगरी सजली होती. मर्यादा, सत्यवचन आणि महापराक्रमी मर्यादापुरुषोत्तम म्हणून प्रभू रामचंद्र समस्त भारतीयांचे दैवत आहेत. राम उपासना हाच आमचा भक्तिमार्ग आहे. भारतासह अनेक देशांमधून रामायण ही कथा लोकजीवनाचा कणा आहे. त्यामुळेच अयोध्देतील रामाच्या प्राण प्रतिष्ठापनेकडे जगभराचे डोळे लागलेले आहेत. हा अवर्णनीय अनुपम असा सोहळा ‘याची देही याची डोळा’ आपल्याला पहायला मिळतोय ही आपल्या पिढीसह युवा पिढीसाठी देखील भाग्यकारक अशीच घटना आहे. आता जगानेच ‘प्रभू रामचंद्रांचे’ अस्तित्व मान्य केले आहे. म्हणूनच नावात काय ? असा भारतीयांना कधी प्रश्न पडत नाही. कारण आमच्या जगण्यातच राम आहे. जय श्रीराम 🙏🏻🙏🏻

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

1

)

  1. jnzende

    मन हे रामरंगी रंगले

    Liked by 2 people