तुमच्याबद्दलची आकर्षकता वाढण्यासाठी लोकांत मिसळा !

It is said that if you always look at yourself in the mirror, there will definitely be a difference in your personality. You try to look more attractive by covering up your innate flaws. But I have the opposite opinion. I think that instead of always looking in the mirror and trying to be more attractive, if you always mix with people, the diversity in them will automatically come to you and others will be more attracted to you. In the end, whether beauty or intelligence ! She can’t attract others unless she shines.

असं म्हणतात की, तुम्ही स्वतःला आरश्यात सदा निरखून पाहिलं तर तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच फरक पडतो. तुमच्यातल्या जन्मजात असलेल्या उणीवा झाकत तुम्ही अधिक आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करता. माझं मात्र याउलट मत आहे. मला असं वाटतं की सदा आरश्यात बघत अधिक आकर्षक होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सदा माणसात मिसळलो तर त्यांच्या मधील विविधता आपोआपच आपल्यामध्ये येईल आणि इतरांमध्ये आपल्याबद्दल आकर्षण वाढेल. शेवटी सौंदर्य असो की बुद्धिमत्ता ! ती चमकविल्या शिवाय इतरांना आकर्षित करूच शकत नाही.

प्रत्येकाला आपण अधिक आकर्षक दिसावे म्हणजेच आपल्या सौंदर्यात बदल व्हावा असे वाटत असते. अर्थात नैसर्गिक म्हणजेच जन्मजात जे सौंदर्य तुम्हाला नियतीने बहाल केले आहे, त्यापेक्षा अधिक पटीने आपण आकर्षक दिसावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी कृत्रिमतेचा आधार घेतला जातो. मात्र कृत्रिम उपाय किंवा सौंदर्यप्रसाधने ही तुमच्या सौंदर्यात वाढ करत नसतात. तर ती फक्त अधिक ‘नेटकेपणा’ आणण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात सुबकता किंवा नेटकेपणा हा देखील आकर्षकता वाढविण्याचा एक मर्यादित उपाय ठरू शकतो. पण हा उपाय फक्त तुमच्या दिसण्यातील आकर्षकता वाढविण्याचा मर्यादित उपाय असतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हाला कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांची नाही तर ‘आसक्ती’ची खरी गरज असते. सौंदर्याप्रती तुमची आसक्ती नसेल केवळ दुस्वास असेल तर हे शक्य नाही. ‘नाही निर्मळ मन, काय करील साबण’ अशी तुमची स्थिती होते. तुमच्यामध्ये जर सौंदर्याबद्दल आसक्ती असेल तरच नजरेत न सामावणारे सौंदर्य तुमच्या पुढ्यात येईल. मार्केटिंगचा एक फार पॉप्युलर फंडा आहे. तुमच्या शरीरावरील कोणत्याही अवयवावर दार्शनिक भागावर मलमपट्टी करा आणि बाजारात फेरफटका मारा. जर लोकांनी तुम्हाला विचारले, काय झाले ? तर तुम्ही त्याबद्दल लोकांना एक छानशी ‘स्टोरी’ तयार करून सांगा. जर लोकांनी काहीच विचारले नाही तर तुम्ही लोकांना लक्ष वेधून घेत सांगण्याचा प्रयत्न करा. जर लोक दुर्लक्ष करू लागले तर तुम्ही पुन्हा-पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करा.  बाकी वेगळं काहीच बोलू नका. बघा काय परिणाम होतो ते…हळूहळू तुमच्या लक्षात येईल की लोक तुमच्या बनवलेल्या मसालेदार स्टोरीत अडकत चाललेले आहेत. हाच फंडा तुम्ही तुमच्या अधिक आकर्षक दिसण्यासाठी वापरून पहा. तुम्ही जे सांगताय त्यालाच लोक सौंदर्याची किंवा अधिक आकर्षक दिसण्याची व्याख्या समजायला लागतील. फॅशनचा जन्म अश्याच वेडगळ कल्पनातून होत असतो. पण यासाठी तुमच्यामध्ये आसक्ती असणे गरजेचे असते.

तुम्हाला जर कावीळ झाली असेल तर सगळं जग तुम्हाला पिवळं दिसतं… असा एक प्रचलित वाक्यप्रचार आहे. तो इथे लागू होतो. कारण अधिक आकर्षक दिसण्यासाठी अंतर्बाह्य बदल करणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागतो. याबद्दलच जर तुम्ही पूर्वग्रह दूषित असाल तर मग तुम्ही यावर कोणत्याच पध्द्तीने विश्वास ठेवायला तयार नसता. मग तुम्हाला तुमच्या ‘अवतीभवती’ असणारे सौंदर्य देखील आकर्षित करू शकत नाही. शेवटी सौंदर्याची अनुभूती मिळवणं याला देखील एक मानसिकता आणि नजर लागते. तुमच्याच मनात जर त्याविषयी घालमेल असेल तर मग तुम्ही सौंदर्याची अनुभूती घेवू शकत नाही. वेगवेगळ्या वातावरणात भाषा, संस्कृती आणि समाज धारणेनुसार सौंदर्य किंवा आकर्षकतेच्या व्याख्या आणि समज वेगवेगळे आहेत. काळ्याकुट्ट निग्रो लोकांत देखील आकर्षकतेचे अधिक आकर्षण असते. तसेच चिनी किंवा मंगोलियन लोकांमध्ये देखील असते. प्रत्येकाच्या आकर्षणाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. तशीच त्यांची मर्मस्थळे देखील वेगळी आहेत. भारतीय लोक मात्र दिसण्याबरोबरच त्याच्या राहणीमान आणि वागणुकीकडे अधिक आकर्षित होतात. कारण भारतीयांमध्ये एक पक्की मानसिकता दिसते ती म्हणजे दिसण्यावर भाळून जावू नये. कारण सौंदर्य हे सदाबहार नसते तर ते कधी ना कधी कोमेजून जाणार असते. त्यामुळे व्यक्तिमत्त्वातील आकर्षकता हीच भारतीयांसाठी महत्वाची मानली जाते. व्यक्तिमत्त्वातील आकर्षकता अधिक उठावदार करण्यासाठी भारतीय सभ्यता, संस्कृती आणि देशी राहणीमान हीच त्रिसूत्री रामबाण उपाय ठरणारी आहे. पटलं तर लाईक करा…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Manik Gosavi उत्तर रद्द करा.

Comments (

1

)

  1. Manik Gosavi

    “नाही निर्मळ मन काय करील साबण”

    Liked by 1 person