माझ्या मित्रांनो… राजकीय विषय सोडून आपण बोलूया…!

In a country like India, whenever the political atmosphere starts to heat up, communal and religious issues stir social life. Because in India, the political atmosphere is rarely heated except for elections. Elections are seen as a grand celebration of democracy by ordinary citizens. But politically parties have an eye on elections as a test to come to power. It is expected that the elections held in a democracy should be based on the ideology. But all the political parties who are eager to woo the voters and win their vote fall from the ideology of development and arrive at religious and communal considerations. This is what has been seen so far. Social media has been added to it.

भारतासारख्या देशात जेंव्हा-जेंव्हा राजकीय वातावरण तापायला सुरुवात होते तेंव्हा-तेंव्हा जातीय आणि धार्मिक विषयांनी समाजजीवन ढवळून निघते. कारण भारतात निवडणुकांशिवाय फार क्वचित प्रसंगी राजकीय वातावरण तापलेले दिसते. लोकशाहीचा महा उत्सव म्हणून निवडणुकीकडे सर्वसामान्य नागरिक पहात असतात. तर सत्तेवर विराजमान होण्याची परीक्षा म्हणून राजकीय पक्षांचा निवडणुकांवर डोळा असतो. लोकशाहीत होणाऱ्या निवडणुका ह्या विचारधारेच्या मांडणीवर आधारित असाव्यात हेच अपेक्षित असते. मात्र मतदारांना भुरळ पाडून त्यांची मते आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी आतुर असलेले सर्वच राजकीय पक्ष हे विकासाच्या विचाराधारेवरून घसरत जातीय आणि धार्मिक विचारांवर पोहोचतात, हेच आजवर पहायला मिळालेले आहे. त्यात सोशल मीडियाची भर पडलेली आहे.

काल संध्याकाळीच चहा प्यायला म्हणून मित्राबरोबर सात रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेलो होतो. सध्या रमजानचे उपवास सुरू आहेत. नेमके नमाज नंतर हॉटेलवर गर्दी झाली. एका परिचिताने खांद्यावर हात टाकून विचारले….इसबार इलेक्शन मे क्या होगा ? कौन जितेगा ? तुम पत्रकार हो, अंदाजा बताओ…. मी निरुत्तर. तो पुन्हा चेकाळला… हमारी ताईचं आयेगी…चॅलेंज लगाव. काय बोलावं ? अजून उमेदवारी अर्ज दाखल नाही, प्रचार नाही की मतदान नाही. बरं कोण निवडून येईल ? हा अंदाज तरी कसा व्यक्त करणार ? आपण काय अंतर्ज्ञानी आहोत. लगाव तो चॅलेंज….डर रहे क्या ? कॉन्फिडन्स होना मंगता है ! त्याच्यातला ‘कार्यकर्ता’ उसळी मारत होता. कसनुसं हसून मी सुटका करून घेतली. पण असा प्रकार आता मतमोजणी होवून निकाल घोषित होईपर्यंत घडणार आहेत. चॅलेंज कोण जिंकेल याला फार महत्व नाहीय. तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला चर्चेत सामील करून घेत थेट ‘चॅलेंज’चा प्रतिस्पर्धी बनवल्या जाते. ते देखील परिचित व्यक्तीच्या माध्यमातून….हे फारच क्लेशकारक असते. कळत-नकळत तुम्ही  समोरील व्यक्तीच्या चर्चेत सामील करून घेतले जाता. पुढे मग त्यांना तुम्ही कोणत्या विचारधारेचे पुरस्कर्ते आहात….यावरून तुम्ही कोणत्या जाती-धर्माचे आहात याचा कयास लावता येतो. बरं समजा चर्चेत सहभागी होवून आपणही आपली मते तावातावाने मांडली, तर काय होणार ? समोरच्याला पटली नाही तर ? त्याने ही चर्चा फारच ‘सिरियसली’ घेतली तर ? इतक्या वर्षांच्या त्याच्या आणि आपल्या संबंधांमध्ये ‘तणाव’ निर्माण होण्याचीच जास्त शक्यता असते. भारतीयांमध्ये राजकीय विषयाच्या अहमिकेतूनच धार्मिक आणि जातीय ‘वादावादीला’ सुरुवात होते. कारण राजकारणामुळेच भारतात धर्म आणि जाती विभागल्या गेल्या आहेत. किंवा असंही म्हणता येईल की, धर्म आणि जातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विचारधारा पक्षीय राजकारणात मिसळलेल्या असल्याने विविध जाती-धर्मांचे अघोषित व्यासपीठ म्हणूनच राजकीय पक्ष विभागले गेले आहेत. मत आणि विचारांचे मुक्त स्वातंत्र्य असलेल्या लोकशाहीत सर्वसामान्य नागरिकांची होणारी ही ‘मुस्कटदाबी’ म्हणजे लोकशाहीचे केवळ दुर्दैवच म्हणावे लागेल.

१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून २०२४ याकाळात ७ टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाणार आहे. त्याकरिता निवडणूक आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होईल. त्यानंतर केंद्रात नवे सरकार अस्तित्वात येईल. लोकनियुक्त सरकार हाच लोकशाहीचा आधार असल्याने सर्वसामान्य लोकांचा सहभाग निवडणुकीमध्ये केवळ मतदानापूरताच असतो. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी उभा करीत असलेला उमेदवार हा पक्षाच्या निवड समितीने ठरवलेला असतो. म्हणजेच निवड समितीची ‘निवड’ योग्य की अयोग्य हे ठरविण्यासाठी निवडणूक होते. मग निवडून आलेल्या उमेदवारांमधून ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्याच्या हाती सत्ता येते. प्रक्रियेत सर्वसामान्य माणूस कुठेही नसतो. बरं सत्ता आल्यानंतर देखील सामान्य माणसाला त्यात स्थान नसते. लोकशाहीत सामान्य माणसाला देवत्व दिले आहे. जसं मंदिरातील गाभाऱ्यात देवाने मूर्ती रुपात निश्चल उभारायचं असतं, अगदी तसाच सर्वसामान्य माणसाने लोकशाहीच्या मंदिरात मूर्ती बनून निश्चल उभे रहायचे असते. मंदिरात, प्रार्थनास्थळात परमेश्वराचं भलं होत नसतं. तो तर त्याच्या पुजाऱ्याच्या बंधनात अडकलेला असतो. मग अशा महा उत्सवात आपण फक्त देवाचा हक्क म्हणून आपले ‘पवित्र मत’ गुप्त पद्धतीने नोंदवायचे असते. त्यासाठी वाद-विवाद करून, मारामारी करून आपल्याच परिचितांच्या जीवावर का उठायचे ? त्यांची विचारधारा ही त्यांना सत्तास्थानी पोहोचण्याची शिडी असते. ती शिडी ते आपल्या छाताडावर रोवतात. ज्यांना या विचारधारेचे पाईक व्हायचे आहे, कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या घरादाराची राख-रांगोळी करून घ्यायची आहे, नेत्यांनी टाकलेले ‘तुकडे’ चघळत आयुष्य त्याच्या पायाशी घालवायचे आहे त्यांनी खुशाल नेत्यांची ‘पालखी’ उचलावी. दुसऱ्यावर बळजबरी करू नये. या देशात राजकारणाव्यतिरिक्तही खूप विषय आहेत. ज्यामुळे समाजाचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे भले होईल अश्या विषयांसाठी आपले आयुष्य समर्पित करावे. बाकी तुमची मर्जी…..तुम्ही खूप जवळचे मित्र आहात, सोशल मीडियावर सक्रिय आहात म्हणूनच मी कळकळीने सांगतोय मित्रांनो आगामी तीन महिने आपण राजकीय विषयावर नको बोलायला….! त्यावरून माझी जात आणि धर्म निघणार असेल तर हे धिंडवडे नकोत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Manik Gosavi उत्तर रद्द करा.

Comments (

2

)

  1. Manik Gosavi

    ☑️☑️

    Liked by 1 person

  2. smitahingne

    👍

    Liked by 1 person