India has the highest number of people who fast…..!
In extremely poor and underdeveloped countries, people stay hungry due to lack of food. In developed countries, people fast on medical advice to maintain good health. In India, however, the majority of people fast for religious and spiritual reasons. Recently, due to the blind imitation of Western culture and changes in lifestyle, the number of people who fast on medical advice (to control their diet) has also increased in India.
जगातील अतिशय गरीब आणि अविकसित देशात अन्नावाचून लोक उपाशी राहतात. तर विकसित देशात चांगले आरोग्य रहावे म्हणून वैद्यकीय सल्ला घेत उपवास करतात. भारतात मात्र धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांचा हवाला देत उपवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत जीवनशैलीत बदल केल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार उपवास ( आहारावर नियंत्रण आणण्यासाठी ) करणाऱ्यांचे देखील भारतात प्रमाण वाढले आहे.


आर्टिकलच्या सुरुवातीलाच उपास घडणे आणि उपवास करणे यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. उपास घडणे याचा सरळ अर्थ अन्नाची ददात किंवा वंचना. भुकेच्यावेळी खायला न मिळणे म्हणजे उपास घडणे तर उपवास हा मनःशांती मिळविण्यासाठी धार्मिक किंवा अध्यात्मिक अधिष्ठानावर केलेला एक तार्किक उपचार आहे, असं मी मानतो. काहीजण विज्ञानाचा आधार घेत आरोग्यासाठी जरी उपवास करत असले तरी भारतात बहुतांश लोक विशेषतः भारतीय स्त्रिया ह्या धार्मिक व्रतवैकल्ये आणि धर्मसंस्काराचा भाग म्हणून उपवास करतात. शरीराला आवश्यक तो आहार न मिळणे हा उपास तर आहाराची कमतरता नसतानाही मनाचा तजेला आणि ईशस्तुतीसाठी केलेला मनःशांतीचा उपाय म्हणजे उपवास, अर्थात उपवासात ईशस्तुतीमध्ये चित्त एकाग्र रहावे यासाठी नियंत्रित आहार असावा याकरिताच उपवासात फलाहार आणि पचायला हलके असणारे पदार्थ (उपवासाच्या तर्कशास्त्रात सर्वमान्य असे उपवासाला चालणारे पदार्थ) खायला मुभा असते. भारतात नांदणाऱ्या सर्वच जाती-धर्मातून उपवास ही संकल्पना त्या-त्या धर्माच्या तर्कावर आधारित असली तरी आहार नियमांना आपआपले तर्क लावले जातात. थोडक्यात उपवास असला तरी आहार हा केला जातोच. भारतीय लोक उपवासात फलाहाराबरोबरच शाबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा चिवडा-वेफर्स खाण्याला पहिली पसंती देतात. हाच आहार का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापेक्षा ‘शास्त्र असतं ते’ असं मोघम उत्तर भारतीय लोक परंपरेने स्वीकारतात. खरं म्हणजे रोज आपण जे अन्न खातो त्यात बदल असणारा आहार उपवासाला खायला मिळतो हाच उपवास करणाऱ्या नवागताचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे उपवासाच्या वेळी उलट जादा आहार होतो.

आता नियंत्रित आहाराचा अभाव आणि बदललेली जीवनशैली यामुळे वाढणारे वजन आणि बेढब आकारमान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारतज्ज्ञ सांगतात त्यानुसार उपवास आणि आहार घेणारा वर्ग पाश्चात्य देशांप्रमाणेच भारतात देखील आहे. मात्र गरीब आणि अविकसित देशांमधील पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने होणारी उपासमार हा वेगळा विषय आणि प्रसंगी अन्नाची नासाडी होईल इतकी मिजास दाखविणाऱ्या भारतीयांची ‘उपवासमारी’ वेगळी. भारतात देखील अन्नासाठी दाहीदिशा वणवण फिरणारे लोक आहेत, कधी निसर्गाच्या अवकृपेमुळे अन्नाची चिंता निर्माण होणाऱ्या घटना देखील भारतात घडतात. पण अश्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची क्षमता भारत बाळगून आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी भारताने एव्हढी प्रगती तर नक्कीच केली आहे.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to The SW Eden उत्तर रद्द करा.