“एकमेकांचे स्वातंत्र्य आणि गोपनीयता राखली जावी…!”
What’s something you believe everyone should know.
There is a saying in Marathi, “अति परिचयात अवज्ञा” (Familiarity breeds contempt). It means that when we become too familiar or close with someone, we stop valuing that relationship. This happens quite often. We may get along very well with someone—our thoughts and nature align, leading to increased intimacy. In this closeness, both individuals begin to take each other for granted. While this behavior is tolerated in some matters, in others, it poses a threat to personal freedom and privacy. At such times, the bond between them starts to break, and they begin to feel uncomfortable in each other’s company, eventually leading to avoidance.
- Nowadays, everyone desires privacy. Whether or not the privacy you want is respected depends on the type of community you live in. Of course, I’m speaking about educated societies. Educated people tend to understand personal freedom and privacy well.
- However, the situation is completely opposite when it comes to semi-educated or uneducated communities. Due to a lack of education, they often develop an inferiority complex toward educated people. This also causes them to feel a sense of insecurity. When an educated person comes into their contact, out of this insecurity, they either keep a certain distance or, if they develop trust, they get so close that they start crossing the boundaries of that person’s freedom and privacy, intruding into their personal life. Their behavior aims to convey that despite the education, this person is just like them. You might have particularly noticed this with domestic workers.
- As I live in a lower-middle-class colony, I experience this issue frequently. The lower-middle class mostly consists of salaried employees, but many are semi-educated or uneducated. Due to their lack of education, they have an intense sense of insecurity.
- I, too, belong to the middle class. But since I work in journalism and have developed progressive and reformist views, they might see me as somewhat different from them. However, having lived among them for the past 25 years, my family and I have earned their trust. But I pay a daily price for this. There’s no concept of privacy in my life. People drop by our house anytime to chat. They have no sense of time, and they don’t like it when we try to set boundaries. Even if we have guests, they still peek in.
- Earlier, while I didn’t particularly like this behavior, I used to accept it as a necessary part of community and security, as if we were all members of one large family. But now, I’ve grown extremely frustrated with it. Despite explaining this to them many times in different ways, they continue behaving as they always have. They don’t want to change because of their strong feelings of insecurity.

मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे,”अति परिचयात अवज्ञा”. म्हणजे खूप परिचित, अति जवळचे संबंध असले की मग त्याची किंमत ठेवली जात नाही. बऱ्याच वेळा असं होतं. आपले एखाद्याशी खूप पटायला लागते. म्हणजे त्याचे-आपले विचार, स्वभाव जुळतात. मग घनिष्टता वाढते. यामध्ये दोघेही एकमेकांना गृहीत धरून वागायला लागतात. काही बाबतीत हे असं वागणं सहनही केलं जातं. पण काही बाबतीत त्याचे खासगी स्वातंत्र्य आणि गोपनियतेला धक्का बसण्याचा धोका निर्माण होतो. अश्यावेळी जुळलेली मने तुटतात, एकमेकांना सहवास नकोसा व्हायला लागतो. मग एकमेकांना टाळणे सुरू होते.
- आजकाल प्रत्येकालाच प्रायव्हसी हवी असते. तुम्ही कोणत्या प्रकारच्या समाजामध्ये राहता यावर तुम्हाला हवी असलेली प्रायव्हसी जपली जाते का ? हे समजते. अर्थात मी शिक्षित समाजाविषयी बोलत आहे. शिक्षित लोकांना व्यक्तिगत पातळीवरील स्वातंत्र्य आणि गोपनीयता चांगल्या प्रकारे समजू शकते.
- हीच बाब अर्धशिक्षित किंवा अशिक्षित समाजाबाबत एकदम विरुद्ध टोकाची असते. शिक्षणाचा अभाव असल्याने शिक्षित माणसांबद्दलचा त्यांच्या मनात एकप्रकारचा न्यूनगंड तयार झालेला असतो. त्यात पुन्हा त्यांना कमालीची असुरक्षितता वाटत असते. त्यामुळे शिक्षित माणूस त्यांच्या संपर्कात आला की असुरक्षिततेच्या भावनेतून एक तर ते त्याच्याशी विशिष्ट अंतर ठेवून वागतात. किंवा त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला तर ते इतकी जवळीकता वाढवतात की त्याच्या स्वातंत्र्य आणि गोपनियतेच्या सीमा ओलांडून ते त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात दखल घ्यायला लागतात. हा शिक्षित असला तरी आमच्या सारखाच आहे हेच त्या वर्तनातून त्यांना सुचवायचे असते. हा अनुभव तुम्हाला विशेषतः घरकाम करणाऱ्या नोकरांकडून मिळाला असेल.
- मी लोअर मिडल क्लास कॉलनीमध्ये रहात असल्याने मला या गोष्टीचा वेळोवेळी खूप त्रास होतो. लोअर मिडलक्लास समाज हा मुख्यत्वे नोकरदार वर्गात मोडतो. पण या वर्गात अर्धशिक्षित किंवा अशिक्षित मोठ्या प्रमाणात आढळतात. शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांच्यात कमालीची असुरक्षिततेची भावना असते.
- मी आणि माझे कुटुंब देखील मिडलक्लासच आहोत. पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने नवमतवादी आणि सुधारणावादी विचारसरणी रुजल्याने ते मला कदाचित त्यांच्यापेक्षा वेगळा समजत असतील. पण गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांच्यासमवेतच रहात असल्याने मी आणि माझे कुटुंब त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो आहोत. पण याची किंमत मला रोज चुकवावी लागते. आमच्याकडे प्रायव्हसी हा प्रकारच नाही. कधीही कोणीही आमच्या घरात गप्पा मारायला येवून बसतात. त्यांना वेळेचं भान नसतं किंवा त्यांना अटकाव केलेला देखील आवडत नसतो. तुमच्याकडे कुणी पाहुणे जरी आलेले असले तरी ते डोकावून जातातच.
- पूर्वी सोबत आणि सुरक्षितता म्हणून हा प्रकार रुचणारा नसला तरीही आवश्यक वाटायचा. आपल्याच कुटुंबातील घटक असल्याप्रमाणे वागविले जात होते. पण आता ह्या प्रकारचा खूप तिटकारा निर्माण झाला आहे. खूप वेळा, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजून देखील सांगितले. पण त्यांच्या अंगवळणी जे आहे तेच ते करतात. त्यांना बदलायचं नाहीय. कारण फक्त असुरक्षिततेची भावना .

:-Mukund Madhukar Hingne.
Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.