“Forgiving yourself brings a sense of inner peace…!”

When we point out a mistake made by someone—whether unintentionally or deliberately—and they either accept or deny it, we often rush to take credit for being the “forgiving” one. However, have we ever considered the inner peace that comes from forgiving ourselves, rather than the artificial satisfaction of forgiving others?

Yes… when we reach a level of self-detachment where we can truly forgive ourselves, we come much closer to inner peace. After all, humans are inherently flawed. We, too, make countless mistakes. Instead of being harsh on ourselves, we must learn to correct our mistakes with a neutral mindset and seek our own forgiveness.

Forgiveness is for yourself because it sets you free. It releases you from the prison where you had confined yourself.
  1. Forgiveness is not just for others; it is, first and foremost, for yourself. When someone has wronged you or caused you pain, feelings of anger, sorrow, and bitterness tend to build up. Holding on to these negative emotions traps you in a mental and emotional prison of your own making.
  2. Forgiveness means accepting the pain, letting go of its hold on you, and setting yourself free. It is not about forgetting but about moving forward for your own peace of mind. The person you forgive may not be affected by it at all, but it will certainly lighten the burden on your heart.
  3. Forgiveness brings inner calm, preserves mental well-being, and allows you to embrace life with renewed enthusiasm. That is why the greatest benefit of forgiveness is not for the other person—it is for yourself!

“स्वतःला क्षमा करण्याने मनःशांतीचा अनुभव मिळतो…!”

समोरच्या व्यक्तीने नकळत किंवा मुद्दामहून केलेली चूक लक्षात आणून दिल्यानंतर जर त्याने ती मान्य केली किंवा अमान्य केली, तरीही याचे श्रेय स्वतःकडे घेण्याच्या नादात आपण लगेचच त्याला “माफ” केल्याचा पवित्रा घेतो. पण इतरांना माफ करण्याच्या कृत्रिम समाधानापेक्षा कधी स्वतःला माफ करण्यातून मिळणाऱ्या मनःशांतीचा विचार केला आहे का ?, होय…स्वतःला देखील आपण माफ करण्याइतके निरपेक्ष आपण ज्यावेळी बनतो त्याचवेळी आपण मनःशांतीच्या खूप जवळ जातो. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. त्यामुळे आपण स्वतः देखील अनेक चूका करत असतो. तटस्थपणे त्या चुका सुधारू आपण स्वतःची माफी मागायला शिकले पाहिजे.

क्षमाशीलता ही स्वतःसाठी असते कारण ती तुम्हाला मुक्त करते. ती तुम्हाला त्या कैदेतून बाहेर काढते, जिथे तुम्ही स्वतःला अडकवून ठेवले होते.

१) क्षमाशीलता ही फक्त दुसऱ्यांसाठी नसते, ती सर्वप्रथम स्वतःसाठी असते. जेव्हा एखाद्याने आपल्यावर अन्याय केला असेल किंवा वेदना दिल्या असतील, तेव्हा मनात राग, दुःख आणि कटुता साठून राहते. ही नकारात्मक भावना मनात बाळगल्याने आपणच मनाने आणि विचारांनी त्याच्या कैदेत अडकतो.

२) क्षमाशीलता म्हणजे त्या वेदनांना स्वीकारून, त्यांचा बंदिवास सोडून स्वतःला मुक्त करणे. हे विसरणे नाही, तर स्वतःच्या मन:शांतीसाठी त्या प्रसंगातून बाहेर पडणे आहे. ज्याला आपण माफ करतो, त्याच्या आयुष्यावर याचा कदाचित काही परिणाम होणार नाही, पण आपल्या मनावरील भार हलका होईल.

३) क्षमाशीलतेमुळे मन शांत होते, मनःस्वास्थ्य टिकते आणि आपण पुन्हा नव्या उत्साहाने जीवन जगू शकतो. म्हणूनच, क्षमा करण्याचा सर्वात मोठा फायदा दुसऱ्याला नसून, तो स्वतःलाच मिळतो!

:-Mukund Madhukar Hingne.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

2

)

  1. Nicholas K F Matte

    This is GOOD! I learned some!

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      🙏🙏🙏

      Liked by 1 person