It has been almost six months since I wrote even a single word on my blog. I fully agree that if you write something regularly, people are naturally drawn to your blog. Without that, your followers don’t grow—this too I understand well. In the last four or five years, I had never taken such a long break from blogging. That doesn’t mean I did no writing at all during these six months. But why didn’t I feel like expressing myself on the blog?
I admit, to some extent, that I am a bit lazy. But not writing a single word on the blog for six whole months… even I cannot clearly find the exact reason for it.
Saying that nothing new comes to mind cannot be a convincing reason. When so much is happening and changing in the world around us, claiming that nothing comes to mind wouldn’t convince anyone. Yet, many people have personally experienced such phases in life. I, too, have gone through it.
Anyway… now I have firmly decided to reconnect with you all once again. That’s all. Now, we shall meet every day…!

मी पुन्हा लिखाणासाठी सज्ज होतोय…..!
जवळपास सहा महिने होवून गेलेत मी ब्लॉगवर एक अक्षर देखील लिहलं नाही. तुम्ही रोज काहीतरी लिहीत असाल तर तुमच्या ब्लॉगकडे लोक आकर्षित होतात. हे मला मुळातच मान्य आहे. त्याशिवाय तुमचे फॉलोअर्स वाढत नाहीत. हे पण मला पटतं. गेल्या चार-पाच वर्षात मी ब्लॉगवर लिखाणासाठी एव्हढा गॅप कधीच घेतला नव्हता. म्हणजे मी गेल्या सहा महिन्यात लेखनाचं काहीच काम केलं नाही असं अजिबात नाही. पण ब्लॉगवर व्यक्त व्हावं असं मला का वाटलं नसावं ? मी बऱ्यापैकी आळशी आहे हे मी पहिल्यांदा कबूल करतो. पण ब्लॉगवर अगदी सहा महिने एक अक्षर देखील लिहायचं नाही…..मला स्वतःलाच याचं नक्की कारण सापडत नाहीय.
नवीन काही सुचत नाही हे काही ठोस कारण होवू शकत नाही. आजूबाजूला जगात एव्हढी उलथापालथ होत असताना तुम्हाला काहीच सुचत नाही हे कारण कुणालाच पटणारे नाही. पण असा गॅप येतो आयुष्यात असा खूप जणांचा व्यक्तिगत अनुभव आहे. याचा मी देखील प्रत्यय घेतला. असो….आता पुन्हा तुमच्याशी सुसंवाद साधण्याचा मनाशी पक्का निर्णय घेतला आहे. एव्हढंच. आता आपण रोज भेटू…..!

:-Mukund Madhukar Hingne.
Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.