The Grand Festival of Marathi Theatre Competitions Begins in Grand Style…!

The Maharashtra State Amateur Drama Competition 2026, organised by the Department of Cultural Affairs and the Directorate of Cultural Affairs, Government of Maharashtra, commenced with great enthusiasm and grandeur on November 16 at 23 centres across the state, marking the spectacular beginning of this grand theatrical festival.

There has been a slight delay in bringing you a report on such a grand inauguration and the competition itself. The reason, however, is quite understandable. I am participating in this prestigious State Drama Competition as one of the judges.

Considered one of the most prestigious competitions for amateur Marathi theatre artists, this year marks its 65th edition. Except for the two years during the COVID pandemic, the competition has continued uninterrupted over the decades.

The preliminary rounds of the competition begin simultaneously across 24 centres in Maharashtra. This year, the competition has received an unprecedented response from amateur theatre groups across the state, with as many as 542 theatre organisations registering their participation. Through this platform, thousands of amateur artists are showcasing their talent and putting their artistic skills to the test on stage.

Significantly, in a first-of-its-kind initiative to bring greater transparency to the competition, an online application system was introduced this year for the selection of judges. A record 203 applications were received from across Maharashtra, from which 72 expert judges were shortlisted and selected. I am personally delighted and honoured to have been selected as one of the judges through this transparent selection process.

मराठी नाट्य स्पर्धेच्या महाउत्सवाला दिमाखात प्रारंभ…!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा २०२६”चा दि. १६ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील २३ केंद्रावर मोठ्या दिमाखात या महाउत्सवाला प्रारंभ झाला आहे.

एव्हढ्या दिमाखदार उदघाटन सोहळ्याचा आणि स्पर्धेबाबतचा वृत्तांत सांगायला तसा थोडा उशीरच झालाय. त्याला कारण देखील तसंच आहे. मी या राज्य नाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून सहभागी आहे. हौशी मराठी कलावंतासाठी अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे हे ६५ वे वर्ष आहे. कोविड काळातील दोन वर्षे वगळता ही स्पर्धा अखंडितपणे सुरु आहे. राज्यातील एकूण २४ केंद्रावरून या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ होतो. यंदाच्या स्पर्धेला राज्यभरातील हौशी कलावंतांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून तब्बल ५४२ नाट्यसंस्थांनी यात सहभाग नोंदवला आहे. या माध्यमातून हजारो हौशी कलावंत रंगमंचावर आपले कला कौशल्य पणाला लावत आहेत.

विशेष म्हणजे, स्पर्धेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी यंदा पहिल्यांदाच परीक्षकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वापर करण्यात आला, ज्यासाठी राज्यभरातून विक्रमी असे २०३ अर्ज प्राप्त झाले असून त्यातून ७२ तज्ज्ञ परीक्षकांची निवड करण्यात आली आहे. अशा निवड प्रक्रियेतून माझी परीक्षक म्हणून निवड झाल्याचा वैयक्तिक मला देखील आनंद झाला आहे.

:- MUKUND HINGNE.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Comments (

0

)