If I change my self rather than the world, I will be happier…!

जगापेक्षा स्वतःमध्ये बदल घडला तर जास्त आनंद होईल….!

What change, big or small, would you like your blog to make in the world?

People who have many insecurities often fear expressing themselves at all. At. Such times, they really need an open platform. It has only been two years since I started my blog avatibhavati.com  I am not very active on social media. In fact, I have been in journalism for 28 years. Since I work in print media, I might have developed a bias against social media…I don’t know. But being in the same field and circle, I was doing the same things repeatedly. My mother tongue is Marathi and English is a challenging and tedious journey for me. That’s why I faced many obstacles when I started my blog. Initially, I wrote in my own language with the expectation that I could reach people who speak my dialect all over the world. But then, who will respond and subscribe ? How much response will your writing get ? Even today, I fear the English language. But I decided to embrace English to connect with all of you and to convey my writing and thoughts to you. Now I translate my copies in to  English with the help of translater app. Consequently, I am getting a good response. I also read your posts with the help of Google Translator, which helps me understand your feelings. I am overcoming my fear of the English Language….Will I ever have as much command over it as I do with my language ? I don’t know…. But I certainly won’t despise other languages. This is the small benefit I have gained…Now I need to make you my own….

स्वतःमध्ये खुपकाही न्यूनगंड असणारी माणसे इतरांपुढे व्यक्त व्हायला घाबरतात, किंवा ती व्यक्तच होत नाहीत. अशावेळी त्यांना एखाद्या खुल्या व्यासपीठाची खरी गरज असते. मी माझा avatibhavati.com हा ब्लॉग सुरू करून अवघी दोन वर्षे होत आहेत. तसा मी सोशल मीडियावर फारसा नियमित नाही. वास्तविक मी २८ वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आहे. मुद्रण माध्यमातून काम करत असल्याने कदाचित सोशल मिडियाबद्दल मला आकस निर्माण झाला असावा….माहीत नाही. पण मी माझ्याच क्षेत्रात आणि वर्तुळात असल्याने पुन्हा पुन्हा तेच करत होतो. माझी मातृभाषा मराठी आहे. इंग्रजी भाषा माझ्यासाठी अवघड डोंगर चढण्याचा एक धोकादायक आणि कंटाळवाणा प्रवास आहे. त्यामुळेच ब्लॉग सुरू करताना मला खूप अडथळे पार करावे लागले. सुरुवातीला मी माझ्या भाषेतूनच लिहीत गेलो. अपेक्षा ही होती की जगभरात जे माझी बोलीभाषा बोलणारे लोक विखुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मला पोहोचता यावे. पण मग रिस्पॉन्स आणि सबस्क्राईब कोण करणार ? मग तुमच्या लिखाणाला प्रतिसाद किती मिळणार ? आजही इंग्रजी भाषेची मला भीतीच वाटते. पण मग तुम्हा सगळ्यांशी संपर्क व्हावा, माझे लिखाण-विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून इंग्रजी सोबत जमवून घ्यायचं ठरवलं आहे. आता मी माझी कॉपी ट्रान्सलेटर ऍपच्या सहाय्याने इंग्रजीमध्ये रूपांतरीत करतो. आपोआपच आता मला चांगला प्रतिसाद मिळतोय. तुमच्या पोस्ट्स सुद्धा मी गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने वाचतो. त्यामुळे तुमच्या भावना कळतात. इंग्रजी भाषेची भीती दूर करतोय….माझ्या भाषे इतकं प्रभुत्व मिळेल का ? माहीत नाही….पण मी दुसऱ्या भाषांचा तिरस्कार नक्कीच करणार नाही. हाच छोटा फायदा मी मिळवला आहे. आता तुम्हाला आपलेसे करायचे आहे…..

:- Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. newsintercontinental.com

    लिखाण छान. 💐
    भाषेचे भय मानसी धरू नको,भावना दडपू नको॥व्यक्त होणे महत्वाचे, आशय कळला तरी पुरे॥👍

    Liked by 2 people

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद मित्रा 🙏🙏

      Like