The fear in your mind is the root of things going wrong…!

मनातील भीतीच विपरीत घडण्याचे मूळ असते…!

On the battle field, soldiers stationed at the border think only about shooting the enemy in their sights. But what thoughts might be in the mind of their assistant, who is delivering supplies and food to them in the trenches ? Might they be wondering,”will everything be alright until I reach them ?” Or “Am I bringing them their last meal ?” Who knows ? Because the fear in your mind is what often causes the opposite of what you want to happen. Situations are not always the same. You have the option to worry about how an unexpected challenge might affect your regular routine, or you can consciously try to prevent yourself from becoming stressed. If you choose to worry, you’ll become anxious and draw negative conclusions, which can harm your courage. Conversely, if you choose to avoid stress, you’ll be able to accept the situation in front of you and face the challenge head-on. During these times, instead of focusing on what adverse things might happen, you should try to direct your attention towards your aspirations. This will help you stay focused and concentrate all your energy.

युद्धभूमीवर शत्रूच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या डोक्यात त्यावेळी टप्प्यात येणाऱ्या शत्रूला ठार मारणे एव्हढाच विचार असतो. तेच त्याच्यासाठी खंदकात मदत आणि खाण्याच्या चीजवस्तू पोहोचविण्याचे काम करणाऱ्या त्याच्या मदतनीसाच्या डोक्यात कोणते विचार घोळत असतील ? आपण जवळ पोहचेपर्यंत सर्वकाही ठीक राहील ना ! याचाच तो विचार करत असेल का ? मी आत्ता त्याच्यासाठी शेवटाचेच जेवण घेवून चाललोय असा विचार तर मदतनीसाच्या डोक्यात येत नसेल ना ? कुणास ठाऊक, कारण तुम्ही विचार करता नेमके त्याच्या उलट घडण्यास तुमच्या मनात असलेली भीतीच कारणीभूत असते. नेहमी परिस्थिती सारखीच असू शकत नाही. तुमच्यासमोर अचानक येणाऱ्या संभाव्य आव्हानामुळे तुमच्या नियमित दिनचर्येवर कसा परिणाम होऊ शकतो ? याबद्दल काळजी करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. किंवा तुम्ही स्वतःला तणावग्रस्त होण्यापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकता. जर तुम्ही काळजी करण्याचा पर्याय निवडला तर तुम्ही चिंताग्रस्त व्हाल आणि सकारात्मक नसलेले निष्कर्ष काढाल. जे तुमच्या धैर्याला हानिकारक असू शकतात. याउलट तुम्ही जर स्वतःला तणावग्रस्त होण्यापासून रोखण्याचा पर्याय निवडलात, तर तुम्ही तुमच्यासमोर उद्भवलेल्या परिस्थितीचा स्वीकार करू शकाल आणि समोर आलेल्या आव्हानाला सामोरे जावू शकाल. याकाळात कोणत्या प्रतिकूल गोष्टी घडू शकतात यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी तुम्हाला तुमचे लक्ष तुमच्या आकांक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे तुम्ही एकाग्र रहाल, आणि तुमच्या मध्ये असलेली सर्व ऊर्जा केंद्रित करू शकाल.

:-Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)