“Comparison” is an act that keeps the mind alert.

“तुलना” ही मनाला जागे ठेवणारी क्रिया आहे….!

Many times, we choose to embrace detachment to avoid comparing ourselves to others. However, after immersing ourselves in this detachment, we gradually realize that the comparison is still ongoing. When we quietly look within, we come to understand that now we are no longer comparing ourselves with others, but rather with our own selves. Humans are inclined to compare. Comparison is an act that constantly keeps your mind alert.

Sometimes it’s all about dissatisfaction with yourself, as you may tend to compare what you own and what you don’t. There is no doubt that you deserve to have what you desire, but there is a right time for everything. If your sole focus is on what you lack, it will make you concerned or insecure. By doing so in this period, you risk depriving yourself of the gifts of the universe and what it has to offer. Waiting for something to happen straight away may hurt while having faith without expectations won’t. It will only bring greater joy once it occurs. Emphasizing what you have now will make you a bit happier and brighten the waiting time.

  • When I started working, I was earning a very low salary. Without any experience, how much money could I expect from a job taken as a trainee? Yet, other members of the household would still express concern. What will his future be like? How much are kids his age earning? They would constantly make comparisons. As a result, whenever I was at home, I always felt a certain pressure. Why was I lagging behind? The world seemed to be moving so fast. I was constantly worried that if things continued this way, I would remain poor forever.
  • But the answer to everything, not just some things, is time. It takes time for things to go your way. There’s a saying that no one gets more than their destiny or before the right time. Therefore, one must learn to live without making comparisons.

बऱ्याच वेळा आपण इतरांशी आपली तुलना नको म्हणून अलिप्तता स्वीकारायला लागतो. या अलिप्ततेमध्ये रमल्यावर आपल्या हळूहळू लक्षात यायला लागते की अजूनही आपली कुणाशी तरी तुलना सुरूच आहे. शांतपणे जेंव्हा आपण आपल्या मनात डोकावून पाहतो. तेंव्हा आपल्या लक्षात येते की, आता आपण दुसऱ्याशी नाही तर स्वतःशीच तुलना करायला लागलोय. माणूस हा तुलनाप्रिय आहे. तुलना ही एक अशी क्रिया आहे जी तुमच्या मनाला सतत जागे ठेवत असते.

कधी कधी आपल्याबद्दल आपण असमाधानी असणे हे आपल्या स्वतःच्या तुलना करण्याच्या प्रवृत्तीमुळे असू शकते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी आणि नसलेल्या गोष्टींची तुलना करता. यात शंका नाही की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मिळायलाच हवे, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. जर तुमचे लक्ष फक्त तुम्ही काय गमावत आहात यावर असेल, तर ते तुम्हाला चिंताग्रस्त किंवा असुरक्षित करेल. या काळात असे केल्याने, तुम्ही विश्वाकडून मिळणाऱ्या भेटींपासून स्वतःला वंचित ठेवण्याचा धोका पत्करता. काहीतरी त्वरित घडण्याची वाट बघणे वेदनादायक असू शकते, पण अपेक्षेशिवाय श्रद्धा ठेवणे नाही. जेव्हा ते घडेल, तेव्हा ते अधिक आनंददायक ठरेल. आत्ता तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला थोडं अधिक आनंद मिळेल आणि प्रतीक्षेचा काळही उजळून जाईल.

  • मी नोकरीला सुरुवात केली तेंव्हा अगदीच कमी पगार मिळत होता. कुठलाही अनुभव नसताना शिकावू म्हणून स्वीकारलेल्या नोकरीत असे किती पैसे मिळणार ? पण त्यावर सुद्धा घरातील इतर सदस्य चिंता व्यक्त करायचे. आता याच्या भविष्याचे काय होणार ? याच्या बरोबरच्या वयाची मुले किती पैसे मिळवतात ? याची तुलना ते करत बसायचे. त्यामुळे घरात असलो की एकप्रकारचे दडपण कायम माझ्यावर असायचे. मीच असा मागे का ? जग किती पुढे पळतय.
  • असंच राहिलो तर आपण कायमच गरीब राहू या चिंतेने मी कायम घेरलेला असायचो. पण काही गोष्टींना नव्हे तर प्रत्येक गोष्टीला वेळ हे एकच उत्तर असते. तुमच्या मनासारखं व्हायला सुद्धा वेळ यावी लागते. असं म्हणतात की, वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त कुणालाच काही मिळत नसते. त्यामुळेच तुलनेशिवाय जगायला शिकले पाहिजे.

:- Mukund Madhukar Hingne.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

1

)

  1. Veronique

    And the control of perfection, 😀👌

    Liked by 1 person