जाणीवपूर्वक विचलित करणारी माणसे आवडत नाहीत.
What personality trait in people raises a red flag with you?
While interacting in society, we generally maintain smooth relations with familiar people. We tend to avoid dealing with unfamiliar or unknown individuals. However, if we are compelled to interact, we do so while maintaining a certain distance. What could be the reason for this? I believe that when we meet someone for the first time, if we notice something unsettling in their body language or get even the slightest sense that their personality doesn’t align with ours, we refrain from developing a closer relationship with them.
- Everyone’s nature is not the same. It is often said that there are seven people in the world who look alike. But how many people are exact carbon copies of each other in terms of personality? Such a discovery, perhaps, has yet to be made. In other words, there may be people who look alike, but having identical personalities is rare. Everyone has some good qualities, as well as bad ones—just like our bodies have “good bacteria” and “bad bacteria.” As a result, we naturally tend to avoid people who have more negative traits. This is normal, and there’s nothing wrong with it. Why maintain relationships with someone you don’t get along with?
- However, despite this, there are people who, even though you don’t like them, keep crossing your path and deliberately try to unsettle you. Such people certainly make you angry. I, too, dislike such people. Just seeing them makes me furious. Some individuals are so filled with negativity that they can’t bear to see others doing well. These people are constantly engaged in causing harm to disturb others.
- I have a great deal of anger toward people who are deceitful and always instigate conflicts. I stay away from those who have a tendency to humiliate others.

समाजात वावरताना आपण शक्यतो परिचित व्यक्तींशीच आपला व्यवहार सुरळीतपणे ठेवत असतो. अपरिचित किंवा अनोळखी व्यक्तीबरोबर आपण शक्यतो व्यवहार करणे टाळतो. पण अगदीच नाईलाज झाला तर आपण त्याच्यासोबत विशिष्ट अंतर ठेवूनच वागतो. याला काय कारण असावे बरे ? मला वाटतं एखाद्याला आपण पहिल्यांदाच भेटताना त्याच्या देहबोलीतून आपल्याला काही खटकणाऱ्या गोष्टी आढळल्या किंवा बोलताना त्याचा स्वभाव पटणारा नाही याची आपल्याला पुसटशी देखील कल्पना आली तर आपण त्याच्यासोबत घनिष्टता वाढवायला जात नाही.
- प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. असं म्हणतात की, जगात एकसारखी दिसणारी सात माणसे असतात. पण स्वभावाची अगदीच कार्बन कॉपी असणारी माणसे किती असतात ? तर असा शोध बहुदा अजून तरी लागलेला नाही. म्हणजेच एकसारखी दिसणारी माणसे असू शकतात पण एकसारख्या स्वभावाची माणसे असणे अवघडच आहे. प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतात, तसेच वाईट गुण देखील असतात. आपल्या शरीरात जसे “गुड बॅक्टेरिया” आणि “बॅड बॅक्टरीया” असतात अगदी तसेच. त्यामुळे आपल्याला जास्त वाईट गुण असणारी व्यक्ती नकोशी असते. हा सहजस्वभाव आहे. यात गैर काहीच नाही. ज्याच्याशी आपले पटणार नाही त्याच्याशी संबंध कशासाठी ठेवायचे ?
- पण असे असले तरी जी माणसे तुम्हाला नको असली तरी वारंवार तुमच्या समोर येत तुम्हाला जाणीवपूर्वक विचलित करत असतात. अशा माणसांचा तुम्हाला नक्कीच राग येतो. मला देखील अशी माणसे आवडत नाहीत. अशी माणसे नुसती समोर जरी आली तरी संताप होतो. काही लोकांमध्ये नकारात्मकता एव्हढी भरलेली असते की त्यांना इतरांचे चांगले चाललेले बघवत नसते. अशी माणसे नेहमीच विचलित करण्यासाठी सतत काही ना काही इजा पोहचविण्याची कृती करत असतात.
- जी माणसे खोटारडी आणि भांडणे लावण्याचे उद्योग करत असतात, अशा माणसांचा मला खूप राग येतो. समोरच्या व्यक्तीला नेहमीच अपमानित करण्याची विकृती असणाऱ्या लोकांपासून मी कायमच दूर रहात असतो.

:- Mukund Madhukar Hingne.
यावर आपले मत नोंदवा