लेखक: मुकुंद हिंगणे
-
अंधो के शहर में आईना बेचता हूँ मैं ।
I sell mirrors in the city of blinds….कुणा शायरने आपल्या शायरीत म्हंटलेलेच आहे,”अंधो के शहर में आईना बेचता हूँ मैं ।”. तर ‘बेचना’ हा शब्द आलाय म्हंटल्यावर एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आज कोणता ‘किडा’ मी तुमच्या डोक्यात सोडणार आहे. मी कुणी सेल्समन नाही किंवा मार्केटिंग याविषयातील तज्ज्ञ अभ्यासक देखील नाही. मी कुठल्याच एका…
-
भोजनभाऊ कितीही असुद्यात…खर्चाची फिकीर कश्याला…?
What’s the most money you’ve ever spent on a meal? Was it worth it? जर तुम्हाला कुणी विचारलं, आजवर जेवणावळींवर तुम्ही सर्वाधिक खर्च केंव्हा केलात ? तो खर्च सत्कारणी लागला का ? तर या प्रश्नाचं एक साधं उत्तर देवून आपण हा विषयच निकाली काढू……खाऊ घातलेलं काढायचं नसतं अन किती खाल्लं हे मोजायचं नसतं. आदरातिथ्य, सरबराई…
-
निरर्थक वाटणाऱ्या ‘अर्थ’पूर्ण घटनांची एक निष्फळ कथा..!
Scour the news for an entirely uninteresting story. Consider how it connects to your life. वृत्तपत्र माध्यमात काम करीत असल्याने ‘टेबल स्टोरी’ प्रकाराला किती महत्व असते ! याची जाणीव माझ्यासारख्या बोरूबहाद्दराला तेव्हढी परिपक्वता आल्यावरच कळते. बऱ्याचवेळा आम्हा पत्रकारांना दिवसभर भटकूनसुद्धा ‘बातमी’लायक घटना दृष्टीक्षेपात येत नाहीत. अश्यावेळी बातमी मूल्य कमी असणाऱ्या घटनांचा धांडोळा घेत एखादी टेबल…
-
मंदिरे हवीत की ज्ञानमंदिरे…?
ज्या देशातील शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थांचे पेव फुटलेले असेल आणि देवळातील दानपेट्या ओसंडून वाहत असतील अशा देशाचे भवितव्य काय असेल ? या माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. पण ते राजकीय अभ्यासक, नेता, कार्यकर्ता अथवा समर्थकाकडून नकोय. किंवा शासकीय सुविधा लाटलेल्या शिक्षण महर्षी अथवा शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी वर्गाकडून देखील अपेक्षित नाही. कारण ही सर्व मंडळी…
-
तुज ठायी ज्याची प्रीती । त्याची घडावी संगती ।।
Describe one habit that brings you joy. तुम्हाला आनंद देणारी तुमची एक सवय सांगा ? असा प्रश्न कुणी विचारला तर क्षणभर आपण कावरेबावरे होवून जातो. एकतर मुळात आपल्या वाट्याला जे जगणं आलंय त्याचा आनंद कसा घ्यायचा ? हेच मुळात आपल्याला समजलं नसेल तर मग आपण आपल्या आनंद देणाऱ्या एखाद्या सवयीबद्दल कसे बोलणार ? आपण त्याच्याबद्दल…
-
कार्पोरेट नोकऱ्या म्हणजे आळवा वरचे पाणी….!
शर्यतीच्या घोडेबाजारात अशाच घोड्यावर पैसे लावले जातात जो भलेही शर्यत जिंकला नाही तरी चालेल पण ‘चुरस’ निर्माण करणारा असला पाहिजे. इथे थकलेला, लंगडा आणि वयस्क घोडा चालत नाही. रेसकोर्स वर पैसे उधळणाऱ्या सोकॉल्ड व्हाईट कॉलर उच्चभ्रू धनिकांच्या तोंडी एक वाक्य कायम असते….A horse that cannot run,must be shoot. म्हणजेच पळू न शकणाऱ्या घोड्याला गोळी घातली…
-
आजचा दिवस सामान्य होता का ?
Was today typical? भारतीय लोकांची एक साधारण मानसिकता आहे. सेकंदागणिक त्यांना सतत काहीतरी अतर्क्य, अदभूत, रोमांचकारी किंवा अगदीच भीषण थरार घडवून आणणाऱ्या घटना घडाव्यात असे वाटत असते. दिवस उजाडतानाच सर्व ईप्सित सुखे एखाद्या अज्ञात शक्तीद्वारे आपल्या पायाशी लोळण घ्यावीत मात्र इतरांच्या सुखावर ‘वरवंटा’ फिरवा अशी मनोकामना करीतच दिवस सुरू होत असतो. बहुदा याच मानसिकतेचा अभ्यास…
-
तुमच्या ‘यशा’चे सूत्र तुमचा जनसंपर्क
How would you describe yourself to someone? आजच्या तरुणाई समोर एकच ‘लक्ष्य’ ठेवण्यात आले आहे… ते म्हणजे ‘यश’ मिळविणे. यशस्वी होण्यासाठी जी मुलसूत्रं आचरणात आणावी लागतात त्यासाठी चक्क ‘कोर्सेस’ उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात असे कोर्स केल्याने मूलसूत्रांची ‘ओळख’ करून घेतलेला तरुण आयुष्यात यशस्वी होतोच असे नाही. जगाशी संपर्क साधण्यासाठी पायाभूत शिक्षण हे जरी महत्वाचे…
-
माणूस ‘नास्तिक’ बनवल्या जातो…तो मुळात ‘अस्तिकच’ असतो..!
आज ‘आस्तिक-नास्तिक’चा विषय मांडावा म्हणतोय….माझ्या अल्पबुध्दीला झेपेल अशीच मांडणी असणार आहे. आजकाल आम्हा लेखक मंडळींची चांगलीच ‘गोची’ झालीय. धर्मसंस्काराला फाट्यावर मारताना विज्ञानवादाची ढाल पुढे करत आम्ही पुढारलेल्या (राजकीय विचारधारेला आधीन होत) विचारांचे आणि नवमतवादी म्हणून काहीकाळ मिरवतो. पण अर्ध्याअधिक वाटेपर्यंत गेल्यावर आमच्या लक्षात येते मूळ धर्मसंस्काराची पाळेमुळे आम्ही आमच्याच मनातून उखडून टाकू शकलेलो नाहीत. लौकिक…
-
तब्येत उत्तम राहण्यासाठी तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी उपयोगात आणता…?
What strategies do you use to maintain your health and well-being? आपल्या परिचयाचा व्यक्ती काही दिवसांच्या अंतराने भेटला किंवा एखादा दूरचा नातेवाईक जरी भेटला तर संवादाची सुरुवात ” कसे आहात ?” किंवा “काय म्हणते तब्येत” या सरळ वाटणाऱ्या गर्भित अर्थाच्या प्रश्नानेच होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर कदाचित आपणहून बोलायला सुरुवात करण्यासाठी मनात विषयाची जुळवाजुळव करायला काही…