लेखक: मुकुंद हिंगणे

  • पावसाळ्यात अंगावर पाणी उडविण्याची देशी मॅरेथॉन

    पावसाळा कुणाला आवडत नाही ? पहिला पाऊस अंगावर घ्यायला, उघडीप न देता संततधार पडणाऱ्या पावसात ऑफिसला दांडी मारून ‘एक उनाड दिवस’ साजरा करायला कुणाला बरं आवडणार नाही ? आजूबाजूच्या धुळीने मातकट झालेल्या इमारती पावसाने धुवून स्वच्छ झालेल्या नजरेत साठवून घेत रस्त्याच्या कडेला चहाच्या टपरीवर कोंडाळ्यात अर्धेअधिक अंग भिजवत ‘कट’वाला चाय पिण्याची मजा कुणाला नको असते…

  • ….. तरच तुम्ही उपाशी राहणार नाहीत..!

    What foods would you like to make? आज नेहमीच्याच म्हणजे बेरोजगारी, महागाई, विषमता, आर्थिक शोषण, महिनाभर काम केल्यावरही मिळणारे तुटपुंजे वेतन, वाढत्या कुटुंबाच्या गरजा पुरवताना होणारी त्रेधातिरपीट या असल्या डोक्याला मुंग्या आणणाऱ्या विषयावर आपण लिहायचंच नाही असं ठरवूनच बसलोय. आज कुछ हटके हो जाये… म्हणून बहुसंख्य भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन पुरुषांचा नावडता असलेला विषय म्हणजे ‘तुम्हाला…

  • टोमॅटोचा बाजारखेळ अन सोशल मिडियावरची शेती

    तिसऱ्यांदा चांद्रमोहिम राबविणारा भारत देश हा नावापुरताच ‘कृषिप्रधान’ देश राहिला आहे. कारण तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या पाठीमागे वेगाने पळणाऱ्या भारतातील शेतीचे क्षेत्र तितक्याच वेगाने कमी होत चालले आहे. त्यातही ‘शेती’ ही इतकी बेभरवशाची झाली आहे की शेतकऱ्यांनी शेतातून नक्की कोणते पीक घ्यावे हे नव्याने शिकण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच टोमॅटोचा भाव कोसळला म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो…

  • खुपते तिथे दुखते….!

    What bothers you and why? कालपरवाच चांद्रयानाचे यशस्वी उड्डाण करून भारत देश बोटावर मोजण्या इतक्या बलाढ्य देशांच्या पंक्तीत जावून बसला आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात ही एव्हढीच एकमेव उपलब्धी नाही. या सातही दशकांच्या प्रवासात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना वेळोवेळी समर्थपणे तोंड देत कासवगतीने का होईना पण प्रगतीचा प्रवास सुरु आहे. ही झाली देश नावाच्या…

  • यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या १० गोष्टी

    List 10 things you know to be absolutely certain. तुम्ही काम कुठलेही करत असाल त्यात यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी अंगिकाराव्याच लागतात. माणूस परिपूर्ण नसतोच. जसं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं अगदी तसंच त्याची जीवनशैली आणि त्याचे बुद्धिकौशल्य, शारीरिक क्षमता देखील वेगळी असते. प्रत्येकात समान वैशिष्ट्ये असू शकतात पण समान गुण असतीलच असे नाही. त्यामुळेच तो…

  • धाडसाला सुरक्षेची हमी हवी

    Are you seeking security or adventure? आजकाल आयुष्यात काही मिळवायचे असेल तर एकदा तरी धाडस हे करायलाच हवे असे म्हणतात. पण मग हे धाडस करण्यासाठी जी सुरक्षितता हवी असते ती कशी मिळणार ? ती कुणी द्यायला हवी ? जो आपल्याला धाडस करायला प्रवृत्त करतो त्याने की आपण आपलीच सुरक्षा करायला हवी. कार रेस किंवा मोटरबाईक…

  • कृत्रिम अवयवांसाठी सोलापूरचे ‘पायोनियर’ उत्तम पर्याय…!

    १९८० च्या दशकात दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मिळणे हे एक दिव्य स्वप्नच होते. कुबड्यांचा आधार किंवा काठीवर भार देत शरीराचा समतोल राखत आपली दैनंदिनी पार पाडताना दिव्यांगांना (अपंगांना) मोठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. एखाद्या धनिकाला महानगरात जावून लाखों रुपये खर्च करून कृत्रिम अवयव बसविणे शक्य असायचे. मात्र सर्वसामान्यांचे भयंकर हाल व्हायचे. मरण परवडले परंतु अपंग…

  • तुम्ही ‘प्लॅनचेट’ कधी केलंय का ?

    भविष्याची ओढ कुणाला नसते….’उद्या’च्या पोटात काय दडलंय हे जाणून घेण्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. कुंडलीवरून जातकाचे भविष्य सांगणाऱ्या प्रगाढ पंडित ज्योतिषापासून अगदी कुडमुड्या ज्योतिषा पर्यंत, दारावर येणाऱ्या पिंगळ्या पासून नंदीबैलवाल्या पर्यंत कुणाला न कुणाला आपलं भविष्य विचारून घेण्याची धडपड आपण करीतच असतो. यातही पुन्हा काळी जादू, बंगाली तोटके, जारण-मारण, तंत्रविद्या असल्या गूढ प्रकारात देखील आपण…

  • ‘राष्ट्रवादी’ पार्टी फुटली….हायजॅक झाली की सगळं सत्तेसाठीचं नाटक..!

    महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीचे राजकारण करीत सतत सत्तेत राहण्यासाठीच जन्मलेला राजकीय पक्ष हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख सर्वसामान्य मतदारांमध्ये ठसलेली आहे. श्रीमती सोनिया गांधी ह्या जन्माने परदेशी आहेत म्हणून त्या भारताच्या पंतप्रधानपदी नकोत हा उजव्यांशी मिळताजुळता विचार मांडत नव्या ‘राष्ट्रवादा’चा डांगोरा पिटत ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र स्थापनेनंतर…

  • काका-पुतण्याच्या संघर्षातील राजकीय बेरीज-वजाबाकी…!

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि त्यांचे पुतणे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातील ताज्या राजकीय संघर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्वच पणाला लागलेले असताना राज्यातले समस्त बोरूबहाद्दर आणि राजकीय निरीक्षक-अभ्यासक एखाद्या रमल ज्योतिषाप्रमाणे भाकिते वर्तविण्यात मग्न झालेली आहेत. महाराष्ट्राला पहिल्यांदाच काका-पुतण्याच्या राजकीय संघर्ष पहायला मिळतोय असे देखील नाही. केवळ शरदचंद्र पवार यांना त्यांच्या…