लेखक: मुकुंद हिंगणे

  • यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या १० गोष्टी

    List 10 things you know to be absolutely certain. तुम्ही काम कुठलेही करत असाल त्यात यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी अंगिकाराव्याच लागतात. माणूस परिपूर्ण नसतोच. जसं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं अगदी तसंच त्याची जीवनशैली आणि त्याचे बुद्धिकौशल्य, शारीरिक क्षमता देखील वेगळी असते. प्रत्येकात समान वैशिष्ट्ये असू शकतात पण समान गुण असतीलच असे नाही. त्यामुळेच तो…

  • धाडसाला सुरक्षेची हमी हवी

    Are you seeking security or adventure? आजकाल आयुष्यात काही मिळवायचे असेल तर एकदा तरी धाडस हे करायलाच हवे असे म्हणतात. पण मग हे धाडस करण्यासाठी जी सुरक्षितता हवी असते ती कशी मिळणार ? ती कुणी द्यायला हवी ? जो आपल्याला धाडस करायला प्रवृत्त करतो त्याने की आपण आपलीच सुरक्षा करायला हवी. कार रेस किंवा मोटरबाईक…

  • कृत्रिम अवयवांसाठी सोलापूरचे ‘पायोनियर’ उत्तम पर्याय…!

    १९८० च्या दशकात दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मिळणे हे एक दिव्य स्वप्नच होते. कुबड्यांचा आधार किंवा काठीवर भार देत शरीराचा समतोल राखत आपली दैनंदिनी पार पाडताना दिव्यांगांना (अपंगांना) मोठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. एखाद्या धनिकाला महानगरात जावून लाखों रुपये खर्च करून कृत्रिम अवयव बसविणे शक्य असायचे. मात्र सर्वसामान्यांचे भयंकर हाल व्हायचे. मरण परवडले परंतु अपंग…

  • तुम्ही ‘प्लॅनचेट’ कधी केलंय का ?

    भविष्याची ओढ कुणाला नसते….’उद्या’च्या पोटात काय दडलंय हे जाणून घेण्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. कुंडलीवरून जातकाचे भविष्य सांगणाऱ्या प्रगाढ पंडित ज्योतिषापासून अगदी कुडमुड्या ज्योतिषा पर्यंत, दारावर येणाऱ्या पिंगळ्या पासून नंदीबैलवाल्या पर्यंत कुणाला न कुणाला आपलं भविष्य विचारून घेण्याची धडपड आपण करीतच असतो. यातही पुन्हा काळी जादू, बंगाली तोटके, जारण-मारण, तंत्रविद्या असल्या गूढ प्रकारात देखील आपण…

  • ‘राष्ट्रवादी’ पार्टी फुटली….हायजॅक झाली की सगळं सत्तेसाठीचं नाटक..!

    महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीचे राजकारण करीत सतत सत्तेत राहण्यासाठीच जन्मलेला राजकीय पक्ष हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख सर्वसामान्य मतदारांमध्ये ठसलेली आहे. श्रीमती सोनिया गांधी ह्या जन्माने परदेशी आहेत म्हणून त्या भारताच्या पंतप्रधानपदी नकोत हा उजव्यांशी मिळताजुळता विचार मांडत नव्या ‘राष्ट्रवादा’चा डांगोरा पिटत ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र स्थापनेनंतर…

  • काका-पुतण्याच्या संघर्षातील राजकीय बेरीज-वजाबाकी…!

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि त्यांचे पुतणे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातील ताज्या राजकीय संघर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्वच पणाला लागलेले असताना राज्यातले समस्त बोरूबहाद्दर आणि राजकीय निरीक्षक-अभ्यासक एखाद्या रमल ज्योतिषाप्रमाणे भाकिते वर्तविण्यात मग्न झालेली आहेत. महाराष्ट्राला पहिल्यांदाच काका-पुतण्याच्या राजकीय संघर्ष पहायला मिळतोय असे देखील नाही. केवळ शरदचंद्र पवार यांना त्यांच्या…

  • मेंदूत कोरल्या गेलेल्या आठवणींचे भग्नावशेष…!

    घडून गेलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मेंदूवर कोरल्या जातात असं अजिबात नसतं. मात्र काही ठळक गोष्टी कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. हा जीर्ण अन कोणत्याही क्षणी कोसळण्याची वाट पहात असलेला बंगला….हा मेंदूत घर करून बसलाय. अर्धवट किलकिले पण सताड उघडे दरवाजे, काही तावदाने निखळून पडलेल्या खिडक्या, भिंतींचा रंग पार उडालाय. स्वतःहून कोसळणाऱ्या मलब्याला स्वतःच्याच ओंजळीत घेवून…

  • विवाह नोंदणी संस्थांकडे केल्या जाणाऱ्या अपेक्षा चक्रावणाऱ्या

    माझ्यासारखे वृत्तपत्रात काम करणारे बरेच जण रोज वृत्तपत्र बारकाईने वाचण्याची अजिबात तसदी घेत नाहीत. विशेषतः स्वतः लिहिलेल्या बातम्या किंवा स्फुटलेखन, आर्टिकल अगदी एखाद्या जाहिरातीला ‘टॅग लाईन’ सुचविली असेल तर ती देखील व्यवस्थित आली की नाही ? हे चाळणे म्हणजे वृत्तपत्र वाचणे असा एक समज करून घेतला आहे. त्यातही आपण लिहिलेल्या मजकुरात काही भयंकर चूक आढळल्यास…

  • मार्शल लॉ च्या काळातील सोलापूरचे राष्ट्राभिमानी नगराध्यक्ष माणिकचंद शहा

    ब्रिटिशांच्या जोखडात संपूर्ण देश असताना ‘युनियन जॅक’ उतरवून ‘तिरंगा ध्वज’ फडकवत साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सोलापूर शहरावर ब्रिटिशांनी ‘मार्शल लॉ’ सारखा जुलमी कायदा लागू केला. मुळातच भारतावर राजवट करणाऱ्या ब्रिटिशांनी मार्शल लॉ या जुलमी कायद्याची निर्मिती केल्यानंतर राजकीय उठाव दडपून टाकण्यासाठी या कायद्याचा वापर अखंड भारतात फक्त दोन शहरांवर केला होता. सोलापूर आणि पेशावर (फाळणी…

  • शाहरुखचा ‘पठाण’ अन संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे’…!

    बऱ्याच वर्षानंतर हिरो म्हणून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा एकतर बिग बजेट असून बऱ्याच गॅप नंतर एका सुपर-डुपर हिटसाठी आसुसलेल्या शाहरुखचा सिनेमा असल्याने हा सिनेमा चालला तरच बॉलीवूड तरणार अन्यथा बॉलीवूडचे अस्तित्व धोक्यात येईल असं मानणारे चित्रपट उद्योगातील अनेक अभ्यासक, कलावंत आणि किंग खानला आपला हिरो मानणाऱ्या चाहत्यांना वाटते. त्यामुळे तद्दन मसाला चित्रपट…